
आयसीसी वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशात 2025 या वर्षातील अखेरची आणि टी 20i मालिका खेळत आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका वूमन्स यांच्यात 5 टी 20i सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाने या मालिकेत विजयी सुरुवात केली. भारताने रविवारी 21 डिसेंबरला एकतर्फी विजय मिळवला. भारताने श्रीलंकेवर 8 विकेट्सने मात करत मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता वूमन्स इंडिया सलग दुसरा सामना जिंकून मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर श्रीलंकेसमोर पलटवार करण्याचं आव्हान आहे. अशात हा सामना श्रीलंकेसाठी मालिकेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसरा टी 20i सामना कधी?
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसरा टी 20i सामना मंगळवारी 23 डिसेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसरा टी 20i सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसरा टी 20i सामना विशाखापट्टणमधील एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसरा टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसरा टी 20i सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
दुसरा सामना कोण जिंकणार?
हरमनप्रीत कौर दुसऱ्या टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर चमारी अट्टापट्टू हीच्याकडे श्रीलंकेच्या नेतृत्वाची धुरा आहे. भारताने पहिला सामना हा सहज जिंकला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेलं 122 धावांचं आव्हान हे भारताने 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं. आता टीम इंडिया सलग दुसरा सामना जिंकणार की श्रीलंका पलटवार करण्यात यशस्वी ठरणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
Leave a Reply