
वूमन्स टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या टी 20I मालिकेतील पहिल्या आणि सलग 3 सामन्यांत धावांचा पाठलाग करुन विजय मिळवला. भारताने हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हीच्या नेतृत्वात विजयी हॅटट्रिकसह मालिका आपल्या नावावर केली. आता टीम इंडियाचं मालिका विजयानंतर श्रीलंकेला व्हाईटवॉश करण्याचा प्रयत्न असणार आहे. उभयसंघातील चौथा टी 20I सामना हा रविवारी 28 डिसेंबरला तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला.
श्रीलंकेने टॉस जिंकला, टीम इंडियाची बॅटिंग
तिरुवनंतरपूरममधील चौथ्या टी 20I सामन्यात श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. श्रीलंकेची कॅप्टन चमारी अट्टापट्टू हीने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताची ही या मालिकेत पहिले बॅटिंग करण्याची पहिलीच वेळ असणार आहे. तसेच भारताने मालिका जिंकली आहे. त्यामुळे टीम इंडियाचे फलंदाज बिंधास्तपणे खेळतील हे निश्चित आहे. भारताची लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा (Shafali Verma) हीने या मालिकेत कडक बॅटिंग केलीय. त्यामुळे शफाली पहिल्या डावात बॅटिंग करतान किती धावा करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
जेमीमाह रॉड्रिग्स आऊट
टीम इंडियाने चौथ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 2 बदल केले आहेत. जेमीमाह रॉड्रिग्स हीला आजारामुळे बाहेर व्हावं लागलं आहे. तर क्रांती गौड हीला विश्रांती देण्यात आली आहे. जेमीमाह आणि क्रांती यांच्या जागी हर्लीन देओल आणि अरुधंती रेड्डी यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेनेही प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. काव्या कविंदी आणि रश्मिका शिववंडी या दोघींचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : हसिनी परेरा, चमारी अथापथु (कॅप्टन), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, इमेशा दुलानी, निलाक्षीका सिल्वा, कौशली नुथ्यांगना(विकेटकीपर), मलशा शेहानी, रश्मिका शिववंडी, काव्या कविंदी आणि निमेषा मधुशानी.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, रेणुका सिंग ठाकूर आणि श्री चरणी.
Leave a Reply