
ओपनर शफाली वर्मा हीने केलेल्या नाबाद आणि विस्फोटक खेळीच्या जोरावर वूमन्स टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात धमाकेदार विजय मिळवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियासमोर 129 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हा सामना 49 बॉलआधी 7 विकेट्सने जिंकला. भारताने 11.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 129 धावा केल्या. भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात शफाली वर्मा व्यतिरिक्त जेमीमाह रॉड्रिग्स, स्मती मंधाना आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर यांनीही बॅटिंगने योगदान दिलं. टीम इंडियाने या विजयासह मालिका विजयाचा दावा मजबूत केला आहे.
Leave a Reply