
वूमन्स टीम इंडियाने नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडिया वर्ल्ड कप विजयानंतर सध्या रिलॅक्स मोडवर आहे. त्यामुळे टीम इंडिया आता आपली पुढील मालिका केव्हा खेळणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. अखेर चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. टीम इंडियाची महिला ब्रिगेड एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. टीम इंडिया डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. बीसीसीआयने या टी 20i मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडिया-श्रीलंका टी 20i सीरिज
टी 20i मालिकेला 21 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा विशाखापट्टणममध्ये होणार आहे. दुसरा सामना हा 23 डिसेंबरला विशाखापट्टणममध्येच होणार आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा 26 डिसेंबरला तिरुवनंतरपुरममध्ये होणार आहे. तसेच चौथा आणि पाचवा सामनाही याच मैदानात होणार आहे.
भारत-श्रीलंका टी 20i मालिकेचं वेळापत्रक
- पहिला सामना, 21 डिसेंबर, विशाखापट्टणम
- दुसरा सामना, 23 डिसेंबर, विशाखापट्टणम
- तिसरा सामना, 26 डिसेंबर, तिरुवअनंतरपुरम
- चौथा सामना, 28 डिसेंबर, तिरुवअंतरपुरम
- पाचवा सामना, 30 डिसेंबर, तिरुवअंतरपुरम
Leave a Reply