
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला, तेव्हा असं वाटलेलं की मायदेशात खेळत असल्याने टीम इंडिया वर्चस्व गाजवेल. पण उलटं घडलं. सुरुवातीला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारतावर 2-0 ने विजय मिळवला. त्यानंतर वनडे सीरीजही सहज जिंकू दिली नाही. 2-1 ने भारताने वनडे मालिका जिंकली. त्यात दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 359 धावांचं अवघड लक्ष्य पार केलं. त्यानंतर आता टी 20 सीरीजमध्ये दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. त्यामुळे पाच सामन्यांची टी 20 मालिका चुरशीची होण्याची शक्यता आहे.
गिल भारताचा हा प्रतिभावान खेळाडू टी 20 मध्ये सातत्याने अपयशी ठरतोय. मागच्या दोन सामन्यात त्याने निराशाजनक प्रदर्शन केलं. पहिल्या T20 मध्ये शुबमन गिल 2 चेंडूत फक्त 4 धावा करुन पॅवेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुसऱ्या टी 20 सामन्यात त्याला खातही उघडता आलं नाही. शुबमन गिलने टी 20 इंटरनॅशनलमध्ये शेवटचं अर्धशतक 16 सामन्यांपूर्वी ठोकलं होतं. झिम्बाब्वे विरुद्ध जुलै 2024 मध्ये त्याने अर्धशतकी खेळी केली होती. तेव्हापासून, तो सतत छोट्या-छोट्या इनिंग खेळतोय.
गिलने 30 पेक्षा जास्त धावा कितीवेळा केल्यात?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच टी 20 सामन्यांच्या सीरीजमध्ये सुद्धा तो एकदाही अर्धशतक झळकवू शकला नाही. शुबमन गिलने मागच्या 16 सामन्यात फक्त पाचवेळाच 30 धावांचा आकडा पार केला आहे. भारतात खेळल्या गेलेल्या 8 टी 20 सामन्यात चौथ्यांदा तो सिंगल डिजिट म्हणजे एकेरी धावसंख्येवर आऊट झाला.
गौतम गंभीरने याकडे लक्ष देणं गरजेचं
शुबमन गिलला टीममध्ये ओपनिंगच्या जागेवर खेळवण्यासाठी संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल या दोघांना बाहेर बसवलं जातं. त्यांच्यावर अन्याय होतो असं बोललं जात. पण शुबमनमुळे महाराष्ट्राचा प्रतिभावान फलंदाज ऋतुराज गायकवाडवर सुद्धा अन्यायच होतोय. गौतम गंभीरने याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण ऋतुराज गायकवाडचा नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत टीममध्ये समावेश करण्यात आला होता.
तो सुद्धा योग्य पर्याय ठरु शकतो
दुसऱ्या वनडेमध्ये ऋतुराजने 83 चेंडूत 105 धावांची शतकी खेळी केली. यात 12 फोर आणि 2 सिक्स होते. महत्वाचं म्हणजे CSK कडून खेळताना गायकवाडने अनेकदा सर्वाधिक धावांसाठी दिली जाणारी ऑरेंज कॅप मिळवली आहे. टी 20 मुळे ऋतुराजला ओळख मिळाली. सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. शुबमन गिलच्या जागी तो सुद्धा योग्य पर्याय ठरु शकतो. त्यामुळे पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी त्याचा विचार करणं टीम इंडियाच्या फायद्याचं आहे.
Leave a Reply