
टीम इंडियाच्या टी20 संघाचा उपकर्णधार शुबमन गिल यांच्या पायाला दुखापत झाल्याने संजू सॅमसनला संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर लाभ त्याने उचलला. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याला या खेळीच्या जोरावर संधी मिळू शकते. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)
संजू सॅमसनने 22 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारत 37 धावा केल्या. त्याने 168.18 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. यासह खेळीसह त्याने दोन महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. (फोटो- पीटीआय)
संजूने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळीला सुरुवात केली. त्याने 5 धावा काढल्यानंतर लगेचच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा ओलांडला. यासह हा पराक्रम करणारा 14वा भारतीय खेळाडू बनला. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)
2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी20 मध्ये पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनने आतापर्यंत 51 सामने खेळले आहेत. 43 डावांमध्ये 25.51 च्या सरासरीने आणि 147.40 च्या स्ट्राईक रेटने 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. (फोटो- पीटीआय)
संजूने टी20 क्रिकेटमध्ये एकूण 8000 धावांचा टप्पाही ओलांडला. 319 टी20 सामने खेळणाऱ्या संजूने 303 डावांमध्ये 8 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. संजूने या फॉरमॅटमध्ये 6 शतके आणि 51 अर्धशतके झळकावली आहेत. (फोटो- पीटीआय)




Leave a Reply