• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SA : विराटच्या ऐतिहासिक शतकानंतर जोरदार जल्लोष, रोहित शर्माकडून ऑन कॅमेरा शिवी? पाहा व्हीडिओ

November 30, 2025 by admin Leave a Comment


भारताने रविवारी 30 नोव्हेंबरला रांचीत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळवला. भारताने 350 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 49.2 ओव्हरमध्ये 332 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात केली. कुलदीप यादव याने बॉलिंगने तर विराट कोहली याने बॅटिंगने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. कुलदीप यादव याने दक्षिण आफ्रिकेला ऑलआऊट करण्यात सर्वाधिक योगदान दिलं. कुलदीपने 4 विकेट्स घेतल्या. तर त्याआधी विराट कोहली याने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. विराटने रांचीतील या मैदानात शतक झळकावलं. मात्र विराटच्या शतकानंतर रोहित शर्मा याच्या एका व्हायरल व्हीडिओमुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगली आहे.

रोहितकडून विराटला शिव्या?

विराटचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील 52 वं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 83 वं शतक ठरलं. विराट यासह एका प्रकारात सर्वाधिक शतकं करणारा एकमेव फलंदाज ठरला. विराटच्या या शतकाची साऱ्या भारताला प्रतिक्षा होती. मात्र 90 चा टप्पा पार केल्यानंतर रोहितला विराटच्या शतकाची अधिक प्रतिक्षा होती. ड्रेसिंग रुममध्ये असलेला रोहित विराटच्या प्रत्येक बॉलनंतर हातवारे करुन तसेच हावभावाद्वारे प्रतिक्रिया देत होता. मात्र विराटने शतक केल्यांनतर रोहितने आनंद व्यक्त केला. रोहितने बसल्या जागी उभं राहत विराटसाठी टाळ्या वाजवल्या. रोहितने या दरम्यान विराटला उद्देशून शिव्या दिल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. रोहितचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोहित नक्की काय बोलला असावा?

Rohit Sharma is every Virat Kohli fan right now celebrating Virat Kohli 52nd ODI century against South Africa!#INDvSA #ViratKohli pic.twitter.com/4LBkCeb4Br

— Vishal Verma (@VishalVerma_9) November 30, 2025

विराटची बॅटिंग

विराटने 120 बॉलमध्ये 112.50 च्या स्ट्राईक रेटने 135 रन्स केल्या. विराटने या दरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली.  विराटने या खेळीत  7 षटकार आणि 11 चौकार लगावले. तसेच विराटने या दरम्यान रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. विराट आणि रोहितने भारतासाठी 109 बॉलमध्ये 136 रन्सची पार्टनरशीप केली. या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे भारताला 349 रन्सपर्यंत पोहचता आलं.

दुसरा सामना कधी?

दरम्यान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना हा बुधवारी 3 नोव्हेंबरला होणार आहे. भारताला हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेला मालिकेत कायम रहायचं असेल तर हा दुसरा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागेल.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • युवराज सिंगने भर मैदानात गौतम गंभीरची मान आवळली, हजारो चाहत्यांसमोर नेमकं काय घडलं?
  • Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर; कोर्टात काय घडलं?
  • Dhurandhar: ‘धुरंधर’मधील रहमान डकैत, असलमचं नाव घेताच अख्खा पाकिस्तान घाबरायचा; क्रुर सैतानांची खरीखुरी कहाणी माहिती आहे का?
  • एकहीजण वाचला नाही, सर्वच्या सर्व 22 मजूर ठार, काहींच्या डेडबॉड्या सापडणंही मुश्किल… अख्खा ट्रकच डोंगरावरून कोसळला…
  • सर्दी खोकला झाल्यास लहान मुलांना वाफ देणे योग्य की अयोग्य?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in