
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील चौथ्या टी20 सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण हा सामना सुरु होण्यासाठी काही तासांचा अवधी जाणार आहे. लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमध्ये जवळपास तीन वर्षांनी टी20 आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. पण या सामन्याला नजर लागली असंच म्हणावं लागेल. कारण हा सामना उशिराने सुरू होणार आहे. या सामन्याला उशिर होण्याचं कारण पाऊस वगैरे नाही तर धुकं आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आहे आणि धुक्याची चादर पसरली आहे. अशा स्थितीत हा सामना सुरू करणं कठीण दिसत आहे. त्यामुळे नियोजित वेळेत होणारी नाणेफेक टाळण्यात आली आहे. आता नाणेफेकीचा कौल उशिराने होणार आहे. यापूर्वी संध्याकाळी 7.30 वाजता पंच अंदाज घेतील आणि त्यानंतरच निर्णय घेतील.
मैदानात धुके इतके दाट आहे की टोकावरील स्टँड क्वचितच दिसत आहेत. त्यामुळे फलंदाजी करण्यासाठी आणि क्षेत्ररक्षण करणं कठीण होणार आहे. त्यामुळे नाणेफेकीला उशीर होणार आहे. हा सामना वेळेत सुरु झाला नाही तर काही षटकं कमी केली जाण्याची शक्यता आहे. पण 8 वाजेपर्यंत सुरु झाला तर षटकं कमी केली जाणार नाहीत. पण धुक्याचं सावट तसंच राहिलं तर मात्र कठीण आहे. हा सामना रद्द देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमी धुक्याचं सावट दूर होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान हार्दिक पंड्या मैदानावर मास्क घालून सराव करताना दिसला.
दरम्यान, या टी20 सामन्यापूर्वी भारताचा उपकर्णधार शुबमन गिल हा बाद झाला आहे. सरावादरमन्यात पायाला दुखापत झाल्याने या सामन्यात खेळणार नाही हे निश्चित झालं आहे. त्यामुळे त्याच्या जागी संजू सॅमसन ओपनिंगला उतरणार हे जवळपास निश्चित झालं आहे. पण हा सामना झालाच नाही तर संजू सॅमसनचं नशिब फुटकं आहे असं म्हणायची वेळ येईल. आता हा सामना कधीपर्यंत सुरू होतो आणि संजू सॅमसन किती धावा करतो याची चर्चा क्रीडाप्रेमी करत आहेत.
Leave a Reply