
भारताचा अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी 20i सामन्यात वादळी खेळी साकारली. हार्दिकने अहमदाबादमध्ये 63 धावांची खेळी केली. (Photo Credit : PTI)
हार्दिक कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट झाल्यानंतर पाचव्या स्थानी बॅटिंगसाठी आला. हार्दिकने 25 बॉलमध्ये 252 च्या स्ट्राईक रेटने 63 धावा केल्या. हार्दिकने या खेळीत 5 फोर आणि तितकेच सिक्स लगावले. हार्दिकचं हे टी 20i कारकीर्दीतील सातवं अर्धशतक ठरलं. (Photo Credit : PTI)
हार्दिकने या दरम्यान 16 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. हार्दिकचं हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतील दुसरं अर्धशतक ठरलं. (Photo Credit : PTI)
हार्दिक टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम माजी फलंदाज युवराज सिंह याच्या नावावर आहे. युवीने 2007 साली 12 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. (Photo Credit : PTI)
तसेच हार्दिकने 61 वी धाव पूर्ण करताच इतिहास घडवला. हार्दिकने यासह टी 20i क्रिकेटमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या. हार्दिक भारतासाठी 2 हजार टी 20i धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला. मात्र हार्दिकआधी 2 हजार धावा करणारे पहिले 4 फलंदाज आहेत. तर हार्दिक 2 हजार धावा करणारा पहिला भारतीय ऑलराउंडर ठरला आहे. (Photo Credit : PTI)




Leave a Reply