
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाचवा टी20 सामन्यात हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने अर्धशतकी खेळी केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकात 231 धावा केल्या आणि विजयासाठी 232 धावांचं आव्हान दिलं आहे. (Photo- BCCI Twitter)
तिलक वर्माने 30 चेंडूत अर्धशतक ठोकलं. यावेळी त्याचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी त्याचा आक्रमक पवित्रा पाहून क्रीडाप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे दुसरे अर्धशतक होते. (Photo- BCCI Twitter)
तिलक वर्माने चौकार मारत अर्धशतक साजरं केलं. यासह त्याने टी20 क्रिकेटमधील सहावं अर्धशतक ठोकलं आहे. तिलक वर्माने टी20 क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत सहा अर्धशतकं आणि दोन शतकं ठोकली आहेत. (Photo- BCCI Twitter)
तिलक वर्माने 42 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 73 धावा केल्या. त्याने 173.81 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. शेवटच्या षटकात धावचीत होत तंबूत परतला. तिलक वर्माने संजू सोबत 34, सूर्यकुमार सोबत 18, हार्दिक पांड्यासोबत 105, शिवम दुबेसह 7 धावांची भागीदारी केली. (Photo- BCCI Twitter)
तिलक वर्माने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत 40 सामने खेळले असून 37 डावांमध्ये 49.25 च्या सरासरीने आणि 143.97 च्या स्ट्राईक रेटने 1182 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)




Leave a Reply