• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SA : टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? कॅप्टन सूर्यकुमार शुबमनबाबत म्हणाला….

December 11, 2025 by admin Leave a Comment


टीम इंडियाला गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या टी 20i सामन्यात पराभूत व्हावं लागलं. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 51 धावांनी मात केली. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 214 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताचं 19.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर पॅकअप केलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. न्यू चंदीडगमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने हा लाजिरवाणा पराभव असल्याचं म्हटलं. तसेच सूर्याने पराभवाचं कारणही सांगितलं. सोबतच सूर्याने उपकर्णधार शुबमन गिल याच्या निराशाजनक कामगिरीबाबतही भाष्य केलं.

सूर्यकुमारने कारण काय सांगितलं?

“आम्ही पहिले बॉलिंग केली. आम्ही फार काही करु शकत नव्हतो. आम्हाला फक्त चांगलं कमबॅक करता आलं असतं कारण आम्ही पहिले बॉलिंग केली. त्यामुळे त्यांना (दक्षिण आफ्रिकेला) कशी बॉलिंग करायची हे समजलं. ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. शिका आणि पुढे चालत रहा”, असा आशावाद सूर्याने व्यक्त केला.

“त्यांनी कशी बॉलिंग केली यातून आम्ही धडा घेतला. आम्ही त्यातून शिकलो. त्यातून आता पुढील सामन्यात तसं करण्याचा प्रयत्न करु”, असं सूर्याने नमूद केल.

अक्षर पटेलबाबत सूर्याची प्रतिक्रिया

शुबमन गिल याच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. शुबमनला भोपळाही फोडता आला नाही. शुबमननंतर अक्षर पटेल तिसऱ्या स्थानी आला. अक्षरला तिसऱ्या स्थानी पाठवल्याने चाहत्यांकडून या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलं. सूर्याने याबाबतही सांगितलं.

“अक्षरला पुढे बॅटिंगला पाठवण्याबाबत आम्ही गेल्या सामन्यात विचार केला होता. आम्ही अक्षरला मोठ्या फॉर्मेटमध्ये चांगली बॅटिंग करताना पाहिलंय. अक्षरकडून आजही तशाच प्रकारे बॅटिंग अपेक्षित होती. मात्र अक्षरला तसं करता आलं नाही”, असं सूर्याने स्पष्टीकरण दिलं.

सूर्याची शुबमनच्या फ्लॉप कामगिरीबाबत प्रतिक्रिया

सूर्याने शुबमनच्या सातत्यपूर्ण आणि निराशाजनक कामगिरीबाबत प्रतिक्रिया दिली. “मला आणि शुबमनला चांगली सुरुवात करुन द्यायला हवी होती. कारण दर वेळेस अभिषेक शर्मा याच्यावर विसंबून राहणं योग्य नाही. अभिषेक ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्यानुसार तो ही अपयशी ठरु शकतो. मला, शुबमनला आणि इतर काही फलंदाजांना डाव सावरायला पाहिजे होता”, असं म्हणत सूर्याने बॅटिंगमध्ये टीम म्हणून कमी पडल्याचं मान्य केलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मेस्सीच्या टूरवर कोट्यवधींचा खर्च पाहून ऑलिम्पिक विजेत्या अभिनव बिंद्राचं टीकास्त्र, म्हणाला…
  • Pune Crime : अत्यंत शांत स्वभाव अन्… खासगी क्लासमध्ये वाद विकोपाला अन् विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
  • टीझर पाहून तुमच्या घरातली सासू-सुनेची जोडी आठवेल; ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ची चर्चा
  • Vastu Shastra : घरात या दिशेला कधीच मौल्यवान वस्तू ठेवू नका, अन्यथा कंगाल झालाच म्हणून समजा
  • Rohit Pawar : गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले पोलिसांत मस्ती जिरवण्याची धमक फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in