
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी 20I सामना हा शुक्रवारी 19 डिसेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. मालिकेतील चौथा सामना धुक्यांमुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे मालिका रंगतदार स्थितीत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला पाचवा आणि अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर ही मालिका 2-2 ने बरोबरीचत सोडवण्याचं आव्हान आहे. अशात नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी कुणासाठी अनुकूल ठरणार? हे पीच रिपोर्ट्द्वारे जाणून घेऊयात.
Leave a Reply