• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SA : अर्धशतकी खेळीनंतर हार्दिकने माहिका शर्माला दिला फ्लाइंग किस, व्हिडीओ व्हायरल

December 19, 2025 by admin Leave a Comment


भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिका 3-1 ने जिंकली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी आहे. दुसऱ्या डावात दव फॅक्टर लक्षात घेता क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं होतं. त्यामुळे काहीही करून 200 पार धावा असायला हव्या असा अंदाज बांधला होता. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. पण मोठी धावसंख्या करण्यात दोघंही अपयशी ठरले. तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्यांनी यांनी आक्रमक खेळही आणि धावाही काढल्या. त्यामुळे टीम इंडियाला 231 हा आकडा गाठता आला. हार्दिक पांड्याने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. भारताकडून वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसर्‍या स्थानी आला. युवराज सिंगने 12 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. या खेळीसह हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंड माहिका शर्मा फ्लाइंग किस दिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत दक्षिण अफ्रिका मालिकेतील शेवटचा टी20 सामना पाहण्यासाठी माहिका शर्मा स्टेडियममध्ये उपस्थित होती. हार्दिक पांड्याने अर्धशतकी खेळी केल्यानंतर पहिल्यांदा प्रेक्षकांना बॅट दाखवली. त्यानंतर स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या गर्लफ्रेंड माहिकाकडे पाहिलं आणि फ्लाइंग किस केलं. माहिका मोठ्याने ओरडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच फ्लाइंग किसने प्रतिसाद देताना दिसली.हार्दिक आणि माहिकाचा हा आनंद पाहून सोशल मीडियावरील व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. . हार्दिक पांड्याने काही महिन्यांपूर्वीत माहिकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं.

Hardik Pandya’s flying kiss steals the show!

Spotted with girlfriend Mahieka Sharma cheering wildly from the stands – goals! 💗#HardikPandya #INDvSA

pic.twitter.com/TzW1RxZePm

— Yash MSdian ™ 🦁 (@itzyash07) December 19, 2025

हार्दिक पांड्याने या सामन्यात 25 चेंडूत 63 धावांची खेळी केली. यात त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले. यावेळी त्याने 252 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. इतकंच काय गोलंदाजीतही हार्दिक पांड्याने कमाल केली. हार्दिक पांड्याने 3 षटकं टाकली आणि 41 धावा देत 1 गडी बाद केला. दरम्यान, आयपीएल 2019 मध्ये मुंबई इंडियन्सकडून केकेआरविरुद्ध 17 चेंडूत हा टप्पा गाठला होता.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asia Cup : उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला 8 गडी राखून केलं पराभूत, वैभव-आयुषकडून निराशा
  • Asia Cup Final : अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने, रविवारी हायव्होल्टेज सामना
  • पाणीपुरी दे नाहीतर… मध्यरात्री दुकानदाराने नकार दिल्यामुळे धक्कादायक प्रकार
  • IND vs SA 5th T20i : टीम इंडियाची फायनलमध्ये बॅटिंग, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 3 बदल, संजू सॅमसन In की पुन्हा आऊट?
  • T20 World Cup 2026: शनिवारी टी 20 वर्ल्ड कपसह न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणत्या 15 खेळाडूंना संधी मिळणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in