
IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरीज संपल्यानंतर आता वनडे सीरीज सुरु होणार आहे. सद्य स्थितीत ही वनडे सीरीज खूप महत्वाची नाहीय. कारण वनडे वर्ल्ड कप अजून लांब आहे. सर्व फोकस टी 20 वर्ल्ड कपवर आहे. पण काही खेळाडूंसाठी या सीरीजच महत्व इतर गोष्टींपेक्षा जास्त आहे. सध्या सर्वात जास्त फोकस रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या परफॉर्मन्सवर असेल. कारण टी 20, टेस्ट नंतर आता ते वनडेमधून कधी निवृत्त होणार? अशा चर्चा आहेत. पण रोहित-विराट पेक्षा ऋषभ पंतसाठी ही सीरीज जास्त महत्वाची आहे. त्या सीरीजमधल्या परफॉर्मन्समुळे त्याचं लिमिटेड ओव्हर्समधील करिअर पुढे जाऊ शकतं किंवा थांबू शकतं.
30 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या वनडे सीरीजमध्ये टीम इंडिया शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यासारख्या स्टार फलंदाजांशिवाय उतरणार आहे. अशावेळी दुसऱ्या खेळाडूंकडे चांगली संधी आहे. यात ऋषभ पंत सुद्धा आहे. पंतला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे टीममध्ये स्थान मिळालं आहे. या दरम्यान टीम इंडिया फक्त ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज खेळली. पंत दुखापतीमुळे ही सीरीज खेळू शकला नव्हता.
टीममधील त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह
मागच्या काही वर्षात ऋषभ पंतने टेस्ट फॉर्मेटमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. पण वनडे आणि टी 20 मध्ये त्याला त्याचं स्थान अजून फिक्स करता आलेलं नाही. टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर पंतला टी 20 टीममध्ये अजून स्थान मिळवता आलेलं नाही. इथे त्याच्यासाठी पुनरागमन थोडं कठीण आहे. अशावेळी लिमिटेड ओव्हर्समध्ये फक्त वनडे फॉर्मेट त्याच्याकडे आहे. इथे सुद्धा त्याचं ओव्हर ऑल प्रदर्शन फार चांगलं नाहीय. त्यामुळे टीममधील त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.
मागच्या अडीच वर्षात तो फक्त एक मॅच खेळलाय
वनडे क्रिकेटच्या फॉर्मेटमध्ये पंत टीम इंडियाकडून आतापर्यंत 31 सामने खेळला आहे. यात 27 डावात त्याने फक्त 871 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 33.50 आहे. त्याला आतापर्यंत फक्त एक शतक आणि पाच अर्धशतक झळकावता आली आहेत. वनडे फॉर्मेटमध्ये मागच्या अडीच वर्षात तो फक्त एक मॅच खेळलाय. यात फक्त 6 धावा केल्या. त्याचं कारण होतं, त्याला झालेला अपघात. त्यामुळे तो 2023 चा पूर्ण आणि 2024 चा निम्मा सीजन खेळू शकला नाही. अपघाताआधी इंग्लंड दौऱ्यावर 2022 साली ऋषभने शतक झळकावलं होतं.
खूप ऑप्शन आहेत
ऋषभ पंतसाठी ही सीरीज महत्वाची यासाठी आहे कारण या फॉर्मेटमध्ये टीम इंडियाची पहिली पसंत केएल राहुल आहे. बॅटने सुद्धा तो दमदार प्रदर्शन करतोय. दुसऱ्या विकेटकीपरचा पर्याय म्हणून टीम इंडियाकडे संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल हे ऑप्शन आहेत. अशावेळी टेस्ट टीमचा उपकर्णधार ऋषभ पंतने इथे धावा केल्या नाहीत, तर त्याला फक्त टेस्टच्या एका फॉर्मेट पुरताच संधी मिळेल.
Leave a Reply