
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.बिहार निवडणुकीत एमआयएम पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल संभाजीनगरमध्ये कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. याच कार्यक्रमात अक्षरशः नोटांचा पाऊस पडत असल्याचे चित्र पहायला मिळालं. जलील यांच्यावर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांकडून 100 आणि 500 च्या नोटा उधळण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावरून इम्तियाज जलील यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. इम्तियाज जलील यांची वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा अनेकदा इम्तियाज जलील वेगवेगळ्या वादात सापडले आहेत.
जून महिन्यात माजी खासदार तथा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंबेडकरी संघटनांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला होता. जलील यांनी वापरलेल्या हरिजन या शब्दावर आक्षेप घेत हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावर इम्तियाज जलील यांनी “मंत्री तथा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व करण्यात येत आहे. मी सर्व जातीधर्मांचा आदर करतो” असं म्हटलं होतं. “मी आता रात्री शिरसाट यांच्या स्वप्नात येतो. रात्री ते उठून बसतात” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता.
भाजप आमदाराने काय इशारा दिला आहे?
“मी या शहराचा आमदार, खासदार होतो. मी जातीयवादी आहे, असं कोणीही माझ्याकडे बोट दाखवून सांगू शकत नाही. कारण मी सर्व जाती-धर्माचा आदर करतो. या देशात सर्वात मोठा माणूस कोणी जन्माला आला असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे मी विधानसभा तसेच लोकसभेत सांगितलेलं आहे” असं जलील स्वत:चा बचाव करताना म्हणाले होते. दरम्यान संक्रांतीला एमआयएमने प्रचार केल्यास तक्रार करणार असं भाजप आमदार संजय केणेकर यांनी म्हटलं आहे. “प्रचार थंडावल्यानंतर एमआयएमने संक्रांतीला चिन्ह म्हणून पतंगचा प्रचार केल्याचं आढळून आलं, तर आम्ही निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार करू” असा इशारा भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी दिला आहे.
Leave a Reply