• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IMD Weather Update : प्रती तास 90 किमी वेगानं येतय मोठं संकट, या राज्यांना रेड अलर्ट, पुढील 48 तास अतिधोक्याचे

November 29, 2025 by admin Leave a Comment


बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डिटवाह चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातला आहे. श्रीलंकेमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून, या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार श्रीलंकेमध्ये 123 लोकांचा मृत्यू झाला असून, 130 लोक बेपत्ता आहेत. या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आता हे चक्रीवादळ भारतीय किनारी प्रदेशाच्या दिशेन पुढे सरकलं आहे. भारतीय हवामान विभागाचे महानिदेशक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ शनिवारी रात्री तामिळनाडूच्या किनारी भागामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ मध्यरात्रीपर्यंत तामिळनाडूच्या किनारी भागांपासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असण्याचा अंदाज आहे. तर रविवारी सकाळी हे चक्रीवादळ पुद्दुचेरीच्या किनारी भागांपर्यंत पोहोचणार आहे.

आयएमडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भारतामध्ये देखील चक्रीवादळ डिटवाहची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या आसपास वादळाची गती ही 70 ते 80 किमी इतकी राहण्याची शक्यता आहे, तर आंध्र प्रदेशच्या किनारी भागात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका राहण्याचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस हवेचा वेग वाढून तो प्रती तास 90 किमीवर देखील पोहोचू शकतो. या काळात समुद्रात 8 मीट पर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर मच्छिमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

या राज्यांना रेड अलर्ट

दरम्यान या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा फटका हा तेलंगणाला देखील बसण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारी भागपासून पन्नास ते साठ किलोमीटर दूर अंतरावरून जाणार असल्यामुळे पुढील दोन दिवस या भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती

दरम्यान महाराष्ट्रात संदर्भात देखील मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकणात ढगाळ वातावरण राहणार असून, वाऱ्याचा वेग वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे, थंडी देखील काही प्रमाणात कमी होऊ शकते.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 65 वर्ष जुन्या गाण्यावर रेखा यांचा भन्नाट डान्स, भरजरी लेहेंगा, रॉयल ज्वेलरी आणि दिलखेचक अदा… चाहत्यांच्या खिळल्या नजरा
  • ईव्हीएमवरून विरोधकांत मोठी फूट ? सुप्रिया सुळेंच्या विधानाने काँग्रेस, ठाकरे गटाला टेन्शन, संसदेत काय म्हणाल्या ?
  • ‘कांतारा’मधील चावुंडी देवीची नक्कल करणाऱ्या रणवीरवर भडकला ऋषभ शेट्टी; म्हणाला “मला खूप..”
  • घरात काहीही कारण नसताना सतत भांडण होतात? मग उत्तर दिशेला ठेवा ही एक छोटी गोष्ट
  • Maharashatra News Live : महापालिका निवडणुका जाहीर होताच हालचालींना वेग; अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in