
हृतिक रोशनने आपल्या करिअरमध्ये अनेक Action चित्रपट केलेत. यात मागच्यावर्षी आलेला फायटर चित्रपट आहे. यात पाकिस्तानचा अँगल होता. यावर्षी वॉर 2 रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. हा एक हेरगिरीवर आधारित चित्रपट होता.
आता हृतिक रोशनच्या एका पोस्टमुळे धुरंधर चित्रपट चर्चेत आहे. त्याने या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. पण इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चित्रपटात दाखवलेल्या राजकारणावर असहमती व्यक्त केली होती. त्यानंतर ट्रोलिंग झाल्यावर हृतिक रोशनने आता पलटी मारली आहे.
मी धुरंधर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या पॉलिटिक्सशी सहमत नाही. नागरिक या नात्याने आपण फिल्ममेकर्सनी काय जबाबदारी उचलली पाहिजे, यावर मी वादविवाद करु शकतो” असं हृतिक रोशनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
हृतिक रोशनने त्याचं स्वत:च सोशल मिडिया अकाऊंट बघितल्यानंतर त्याला नाईलाजाने अजून एक पोस्ट करावी लागली असं दिसतय. हृतिकने लिहिलय की, “माझ्या डोक्यातून धुरंधर चित्रपट जात नाहीय. आदित्य धर एक मोठा क्रिएटर आहे. रणवीर सिंहचा परफॉर्मेंस कंसिस्टेंट आहे. अक्षय खन्ना मला नेहमीच आवडतो. सर्वांच कौतुकं. सर्वांसाठी जोरदार टाळ्या खासकरुन मेकअप आणि प्रोस्थेटिक्स टीम्ससाठी. मी पार्ट 2 ची आतुरतेने वाट पाहतोय”
त्याआधी हृतिक रोशनने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलेलं की, “धुरंधरची स्टोरीटेलिंग मला आवडली. पण त्यात दाखवलेल्या पॉलिटिक्सशी मी सहमत नाही. फिल्ममेकर्सची काय जबाबदारी उचलली पाहिजे यावर मी वादविवाद करु शकतो” त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. म्हणून त्याने दुसरी पोस्ट केली.




Leave a Reply