
२०२५ हे वर्ष हॉरर चित्रपटांनी गाजवले आहे. हॉरर जॉनरच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसपासून ते ओटीटी प्लॅटफॉर्म चांगलेच गाजवले. या वर्षी या चित्रपटांनी प्रेक्षकांना फक्त घाबरवले नाही, तर अक्षरश: थरकाप उडवला. सिनेमागृहात तर चित्रपट पाहाताना अनेक प्रेक्षक घाबरले होते. विशेषतः साउथ इंडियन सिनेमाने आपल्या लोककथा आणि जुन्या रीतिरिवाजांना हॉररसोबत जोडले, त्याने प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली.
२०२५ सालाच्या सुरुवातीला ११ एप्रिल २०२५ रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झालेल्या 'छोरी २' ने सुरुवात केली. नुसरत भरूचा आणि सोहा अली खान स्टारर या सीक्वलने पहिल्या भागाप्रमाणे अलौकिक घटक आणि सायकोलॉजिकल भीतीने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवले. मुलीला वाचवण्यासाठी आईची लढाई आणि भयावह शक्तींचा सामना करणाऱ्या कथेने खूपच कौतुक मिळवले होते. या चित्रपटाने हॉररसोबतच सोशल मेसेजही दिला होता.
१ मे रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला 'द भूतनी' या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले होते. संजय दत्त, मौनी रॉय, सनी सिंह आणि पलक तिवारी स्टारर हा हॉरर-कॉमेडी कॉलेज कॅम्पसमध्ये व्हर्जिन ट्रीवर राहणाऱ्या चेटकीणीची कथा होती. हसवणारा आणि घाबरवणारा हा चित्रपट हलके-फुलके मनोरंजन करणारा होता. काहींना तर तो हॉररपेक्षा जास्त कॉमेडी वाटला.
काजोलचा 'मां' हा सिनेमा २७ जून रोजी रिलीज झाला होता. हा मायथॉलॉजिकल हॉरर सिनेमा होता. या चित्रपटात काजोल आईच्या भूमिकेत होती आणि ती आपल्या मुलीला वाचवण्यासाठी देवी कालीचे रूप धारण करते. डेमॉनिक कर्स आणि गावाच्या लोककथांवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातील काजोलच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.
हॅलोविनला, ३१ ऑक्टोबर रोजी थिएटर्समध्ये आलेला मलयाळम हॉरर थ्रिलर 'डाइस इरा'. प्रणव मोहनलाल स्टारर हा चित्रपट राहुल सदाशिवनच्या दिग्दर्शनात बनला आहे. एका श्रीमंत आर्किटेक्टच्या आयुष्यात सुपरनॅचुरल घटनांची कथा प्रेक्षकांना रोमांचित करणारी होती. नंतर ५ डिसेंबर रोजी जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम झालेला हा चित्रपट वर्षातील सर्वात यशस्वी हॉरर चित्रपटांमध्ये गणला गेला.
७ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'बारामूला' चित्रपट. मानवी कौल आणि भाषा सुम्बली स्टारर हा सुपरनॅचरल थ्रिलर काश्मीरच्या बारामूलामध्ये मुलांच्या गायब होण्याच्या तपासावर आधारित होता. पोलिस ऑफिसरच्या घरात लपलेले राज आणि काश्मीरी पंडितांपासून प्रेरित घटकांनी चित्रपटाला इमोशनल डेप्थ दिली. वेगळी स्टोरीलाइन आणि अंगावर शहारे आणणारे सीन यामुळे तो स्पेशल बनला होता.
याशिवाय 'थामा' सारख्या हॉरर फिल्मनेही २०२५ सालात सिनेमागृहांमध्ये खूप जलवा दाखवला. आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना स्टारर फिल्ममध्ये हलक्या अंदाजात हॉररचा तडका पाहायला मिळाला. हा हॉरर-कॉमेडी मूवी तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.






Leave a Reply