• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Horoscope Today 21 December 2025 : दिवस जाणार प्रवासात, या राशींना धनलाभाची शक्यता; रविवारी काय होणार ?

December 21, 2025 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 21 December 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आज, तुमच्या आंतरिक शक्तीमुळे कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कलांमध्ये रस असलेल्यांना हा दिवस अनुकूल वाटेल. तुमच्या कलेची प्रशंसा देखील होऊ शकते.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आज तुम्ही नवीन व्यवसायाची योजना देखील आखाल. महत्वाच्या निर्णयामध्ये तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही मित्रांसोबत लांबच्या प्रवासाची योजना आखू शकता, ज्यामुळे तुमचे मन ताजेतवाने होईल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आज खूप एनर्जेटिक वाटेल. जर तुम्ही अधिक उत्साहाने, मन लावून काम केलं तर तुमचं काम कमी वेळेत पूर्ण होईल. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात होणारे बदल आनंद आणतील. घरात सुरू असलेल्या कोणत्याही वैवाहिक समस्या लवकरच दूर होतील.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

कालपेक्षा आजचा दिवस चांगला असेल. जुने नातेवाईक अचानक भेटू शकतात. आज तुमच्या घरी एखाद्या मोठ्या व्यवसायाच्या निमित्ताने एक छोटी पार्टी होऊ शकते. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

तुम्ही बिझनेसच्या कामासाठी परदेशातही जाऊ शकता. तुमची मुले आज तुम्हाला चांगली बातमी देतील, ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. राजकारणात गुंतलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

महत्वाच्या निर्णयाला घरच्यांकडून पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. एखाद्या प्रतिष्ठित कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत बाहेरचा आनंद घ्या.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आज, तुमच्या व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो जो तुमचा नफा दुप्पट करू शकतो. आजचा दिवस प्रेम जोडीदारांसाठी अनुकूल आहे. तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना आखू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची बदली होऊ शकते, प्रवासात वेळ जाऊन शकतो. आज तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटू शकतो. दिवस आनंदात जाईल.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आजचा दिवस प्रवासात जाईल. ही सहल ऑफिसच्या कामाशी संबंधित असू शकते. प्रवासादरम्यान, तुमची एखाद्या दूरच्या नातेवाईकाशी भेट होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. या राशींच्या आर्किटेक्टसाठी दिवस महत्वाचा असेल, मोठी ऑपर मिळेल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

तुम्ही घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकता. आज आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वात काही बदल करावे लागतील. आर्थिक परिस्थिती आज सुधारेल. जुन्या ठेवी मॅच्युअर झाल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

आज, तुमची सर्व कामे तुमच्या इच्छेनुसार पूर्ण होतील. तुम्हाला एखादा जुना मित्र भेटू शकतो ज्याच्यासोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता. व्यवसायात अचानक आर्थिक लाभाची संधी देखील मिळू शकते.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

आज तुम्ही घरगुती वस्तूंवर जास्त पैसे खर्च कराल. तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळतील. तुमच्या पालकांचे आशीर्वाद मिळाल्याने तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत होईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकीकडे निकालांची धामधूम तर दुसरीकडे राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबईत काय घडतंय?
  • Sindhudurg Local Elections : कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
  • ‘दशावतार’मधील विविध अवतारांमध्ये दिसले मालिकांमधील लोकप्रिय कलाकार
  • BJP MLA Parag Shah : भाजप आमदारानं रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, घाटकोपरमध्ये घडलं काय? VIDEO व्हायरल
  • LIVE Vote Counting of Maharashtra Local Body Election Results 2025: उत्साह शिगेला! कौल कोणाला? 246 नगरपरिषद, 42 नगरपंचायतींचे निकाल टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर बघा लाईव्ह

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in