• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Horoscope Today 16 December 2025 : आज संधी मिळणार, ते काम पूर्ण होणारच.. या राशीच्या लोकांवर मंगळवारी होणार बाप्पाची कृपा !

December 16, 2025 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 16 December 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे, गुड न्यूज मिळेल. आज तुम्हाला तुमच्या धाकट्या भावाकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या जोडीदारासोबतचे झालेला वादमिटवा, घरात शांतता नांदेल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

या राशीच्या आर्किटेक्टसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. शेतकऱ्यांना आज काही फायदे मिळू शकतात. त्यांना त्यांच्या पिकांच्या विक्रीसाठी जमीनदाराकडून इच्छित रक्कम मिळू शकते.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आज तुम्ही इतरांना मदत करण्यास तयार असाल. त्यांचे आशीर्वाद संध्याकाळपर्यंत तुमच्या मनावर नक्कीच परिणाम करतील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांशी त्याबद्दल चर्चा करू शकता.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आज एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर होतील. तुम्ही एखाद्या मित्राला मदत कराल जे भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जर तुम्ही अलीकडेच एखादा प्रकल्प सुरू केला असेल तर आज त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

तुम्ही ज्या संधीची वाट पाहत आहात ती आज प्रत्यक्षात येईल. ते महत्वाचं काम पूर्ण होणार. ऑफिसमधील प्रलंबित कामे तुमच्या वरिष्ठांच्या मदतीने पूर्ण होतील. तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आज नशीब तुमच्या बाजूने असेल. इतरांशी बोलणे आणि व्यवसायात सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. आज आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल. या राशीच्या अविवाहितांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुम्ही सहलीची योजना देखील आखू शकता. यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती वाढेल. आज तुम्ही तुमच्या गोड भाषेने इतरांना तुमचे काम करून देण्यात यशस्वी व्हाल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

जर विवाहित जोडप्यांनी आज त्यांच्या जोडीदारासाठी जास्त वेळ दिला तर त्यांच्या नात्यात गोडवा वाढेल. तुम्ही संध्याकाळी एकत्र एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचा विचार देखील करू शकता. जास्त कामामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आज वागणं लवचिक ठेवा आणि इतर लोकं काय म्हणतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुमच्या व्यवहारी वागण्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला आदर मिळू शकेल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आज तुमचे कोणाशी मतभेद होऊ शकतात. इतरांवर विश्वास न ठेवणेच चांगले. महिलांना आज अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. नव्या जमीन खरेदीचा विचार असेल तर आजचा दिवस उत्तम ठरेल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

आज तुम्हाला तुमच्या वागण्यात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे सभोवतालच्या लोकांना आनंद होईल आणि तुमची चांगली प्रतिमा उजळेल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

आज तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांमधील नातेसंबंध मजबूत होतील. या राशीच्या प्रेमींसाठी आजचा दिवस चांगला आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 Auction : 369 खेळाडूंची जबाबदारी, कोण आहेत ऑक्शनर मल्लिका सागर?
  • Video: अनुष्काच्या डोळ्यात पाणी, विराटने जोडले हात… प्रेमानंद महाराजांच्या मठात नेमकं काय घडलं?
  • हे प्रचंड संतापजनक… या मुख्यमंत्र्यांनी मंचावर ओढला महिलेचा बुरखा… Video समोर येताच संतापाची लाट
  • Ambani Family : एकेकाळी झाडू – फरशी पुसणारा ‘तो’ अंबानी कुटुंबियांमुळे झालाय मालामाल, पण कसं?
  • Mumbai BMC Election: जे हिंदुत्वाचे नाही झाले.. ते मराठी माणसाचे… ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या ‘त्या’ बॅनरची तुफान चर्चा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in