
वूमन्स टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने इतिहास घडवला आहे. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेवर तिसर्या टी 20i सामन्यात 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीतने या विजयासह ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हरमनप्रीत कौर या विजयासह सर्वाधिक टी 20i सामने जिंकणारी कर्णधार ठरली आहे. हरमनने ऑस्ट्रेलियाच्या मेग लेनिंग हीचा कर्णधार म्हणून सर्वाधिक टी 20i सामने जिंकण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. हरमनप्रीतने आतापर्यंत कर्णधार म्हणून 77 टी 20i सामने जिंकले आहेत. तर माजी कर्णधार मेग हीने ऑस्ट्रेलियाला 100 सामन्यांमधून 76 टी 20i सामन्यांमध्ये विजयी केलं होतं.
Leave a Reply