• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Harmanpreet Kaur : कॅप्टन हरमनप्रीत कौरला मोठा झटका, चौथ्या विजयानंतर काय झालं?

December 29, 2025 by admin Leave a Comment


भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध चौथ्या टी 20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हीने या सामन्यात 80 धावांची खेळी केली. स्मृतीने या खेळीसह काही विक्रम आपल्या नावावर केले. स्मृतीने यासह कॅप्टन हरमनप्रीत कौर हीला मोठा झटका दिला. (Photo Credit: PTI)

Smriti Mandhana Team India

स्मृती मंधाना हीने या खेळीत 27 धावा करताच वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. स्मृती डावांच्या हिशोबाने वेगवान 10 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या. स्मृती 10 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारी चौथी महिला फलंदाज ठरली. तसेच स्मृती टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी पहिली भारतीय महिला फलंदाज ठरली. (Photo Credit: PTI)

Women Team India Vice Captain Smriti Mandhana

स्मृतीने चौथ्या टी 20i सामन्यात पहिल्या डावात बॅटिंग करताना 48 चेंडूत 80 धावा केल्या. स्मृतीने या खेळीत 3 षटकार लगावत कॅप्टन हरमनप्रीत कौर हीला झटका दिला. स्मृतीने हरमनप्रीतचा भारताकडून सर्वाधिक 78 टी 20i षटकारांचा विक्रम मोडीत काढला. (Photo Credit: PTI)

Smriti Mandhana Fastest 10 Thousand International Runs

ताज्या आकडेवारीनुसार, स्मृतीच्या नावावर आता टी 20i क्रिकेटमध्ये एकूण 80 षटकार झाले आहेत. स्मृतीने 157 सामन्यांमधील 151 डावांत ही कामगिरी करुन दाखवली. (Photo Credit: PTI)

Smriti Mandhana and Shafali Verma Team India

स्मृतीनंतर आता शफाली वर्मा हीच्याकडे हरमनप्रीत कौरला सर्वाधिक टी 20i षटकाराबाबंत मागे टाकण्याची संधी आहे. शफाली टी 20i क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक षटकार लगावणारी तिसरी फलंदाज आहे. शफालीने 94 सामन्यांमधील 93 डावांत 69 षटकार लगावले आहेत. (Photo Credit: PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतात सर्वाधिक अब्जाधीश कुठे राहतात? जाणून घ्या
  • Sunny Leone : सनी लिओनीच्या न्यू ईअर कार्यक्रमात अश्लीलता? होतेय तुफान चर्चा, वाद का भडकला?
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा धक्का, व्हिसाबाबत मोठा निर्णय, भारतावर काय परिणाम होणार?
  • Vastu Shastra : घरात शमीचं रोप लावताय? मग ही काळजी घ्याच…, अन्यथा घरात नेहमी होतील भांडणं
  • सुशांत सिंह राजपूतने जिथं जीवन संपवलं त्याच घराचं…अदा शर्माचा अचानक मोठा निर्णय; म्हणाली मेलेल्या माणसाचे…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in