• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hardik Pandya vs Gautam Gambhir : टीम इंडिया हरल्यानंतर हार्दिक पंड्या गौतम गंभीरला भिडला का? VIDEO व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद

December 13, 2025 by admin Leave a Comment


भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पाच सामन्यांची T20i सीरीज सुरु आहे. पंजाब मुल्लानपूर येथील दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव झाला. त्यामुळे सीरीज आता 1-1 अशी बरोबरीत आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खूप धावा दिल्या. फलंदाज खास काही करु शकले नाहीत. त्यामुळे हेड कोच गौतम गंभीर यांच्याबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान सोशल मीडियावर गंभीर आणि हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

मुल्लानपुरच्या मैदानावर पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये तणावाचं वातावरण दिसलं. सोशल मीडियावर या मॅचनंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात हेड कोच गौतम गंभीर आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या यांच्यामध्ये कुठल्यातरी गंभीर मुद्यावर चर्चा होताना दिसतेय. व्हिडिओ शेअर करुन काही फॅन्सनी दावा केला की, गौतम गंभीर आणि हार्दिक पांड्यामध्ये जोरदार वाद झाला. या व्हिडिओमध्ये ऑडियो नसल्याने दोघांमध्ये काय बोलणं झालं हे समजू शकत नाही.

जो टीमला भारी पडला

या मॅचमध्ये टीम इंडिया 214 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत होती. 162 रन्सवर डाव आटोपला. सतत फ्लॉप होत असलेला शुबमन गिल खातही उघडू शकला नाही. अक्षर पटेलने तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करताना 21 चेंडूत 21 धावा केल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादवने फक्त 5 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 23 चेंडूत फक्त 20 धावा केल्या. तिलक वर्मा 62 धावांची झुंजार इनिंग खेळला. पण तो पर्यंत उशीर झालेला. या मॅचमध्ये फक्त ठराविक फलंदाजांनाच आपल्या नियमित क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. त्याशिवाय काही खेळाडूंना नवीन रोल दिला, जो टीमला भारी पडला.

Heated conversation between Hardik and Gambhir 👀pic.twitter.com/VtISwnS2FN

— Amar💫 (@KUNGFU_PANDYA_0) December 12, 2025

तिसरा सामना कधी आणि कुठे?

दोन्ही टीम्समध्ये तिसरा सामना धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडिअमवर 14 डिसेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही टीम्ससाठी खूप महत्वाचा आहे. दोन्ही संघांकडे आघाडी घेण्याची संधी आहे. टीम इंडियाचा प्रयत्न मालिकेत पुनरागमन करण्याचा असेल.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोबाईलमधले बॅकग्राउंड ॲप्समुळे तुमचा फोन हँग होतोय? त्यांना ‘या’ योग्य पद्धतीने करा बंद
  • घरात नकारात्मक ऊर्जा आहे की नाही? ‘या’ ट्रिकने जाणून घ्या
  • हेमा मालिनी यांच्याकरिता धर्मेंद्र होते प्रचंड चिंतेत, थेट गृहमंत्री अमित शाह यांना फोन करत..
  • बेबी बंपसह सीमा हैदरचा नव्या घरात प्रवेश, सचिनही नाचतोय ढोल ताशाच्या तालावर, पहा Video
  • हिवाळ्यात मुलांना खोकला आणि कफ होत असेल तर ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील उपयुक्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in