
टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात धमाका केला. हार्दिकने मैदानात चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. हार्दिकने यासह इतिहास घडवला. हार्दिकने या अर्धशतकासह टीम इंडियाच्या तिघांना मागे टाकलं. हार्दिक टीम इंडियाकडून टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारा एकूण दुसरा तर पहिला सक्रीय फलंदाज ठरला. हार्दिकने यासह वेगवान अर्धशतकाबाबत अभिषेक शर्मा याला मागे टाकलं.
हार्दिकने अभिषेकच्या तुलनेत 1 बॉलआधी अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकने इंग्लंड विरुद्ध 17 बॉलमध्ये 50 रन्स केल्या होत्या.अभिषेकने 2025 मध्ये ही कामगिरी केली होती. तसेच टीम इंडियाकडून वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम हा युवराज सिंह याच्या नावावर आहे. युवराजने 2007 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध अवघ्या 12 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. युवराजने त्याच सामन्यात एका ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावण्याची कामगिरी केली होती.
भारताची अप्रतिम सुरुवात
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी बोलावलं. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली. संजू-अभिषेकने पहिल्या विकेटसाठी 63 रन्सची पार्टनरशीप केली. अभिषेकने 21 बॉलमध्ये 34 रन्स केल्या. तर संजूने 22 बॉलमध्ये 37 रन्स करत दमदार कमबॅक केलं. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने या सामन्यातही निराशा केली. सूर्या अवघ्या 5 धावांवर बाद झाला.
हार्दिकची एन्ट्री आणि दक्षिण आफ्रिकेची धुलाई
सूर्यकुमार आऊट झाल्यानंतर हार्दिक पंड्या याची मैदानात एन्ट्री झाली. हार्दिकने मैदानात येताच टॉप गिअरमध्ये बॅटिंगला सुरुवात केली. हार्दिक एका बाजूने फटके मारत होता. तर दुसऱ्या बाजूने तिलक वर्मा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत होता. हार्दिक मोठे फटके मारुन पाहता पाहता पाहता अर्धशतक पूर्ण केलं. हार्दिकचं हे या मालिकेतील दुसरं अर्धशतक ठरलं. हार्दिकने त्याआधी पहिल्या सामन्यात नाबाद 59 धावा केल्या होत्या.
हार्दिकच्या एकूण 63 धावा
हार्दिकची अर्धशतकानंतरही फटकेबाजी त्याच वेगाने सुरु होती. मात्र हार्दिकला अर्धशतकानंतर फार वेळ मैदानात घालवता आला नाही. हार्दिकला अर्धशतकानंतर फक्त 13 धावाच जोडता आल्या. हार्दिकने 252 च्या स्ट्राईक रेटने 25 बॉलमध्ये 63 रन्स केल्या. हार्दिकने या 63 पैकी 50 धावा या अवघ्या 10 चेंडूत केल्या. हार्दिकने या खेळीत 5 षटकार आणि 5 चौकार लगावले. हार्दिकने अशाप्रकारे 10 चेंडूत चौकार-षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. ओटनील बार्टमॅन याने हार्दिकला रिझा हेंड्रीक्स याच्या हाती कॅच आऊट आऊट केलं. अशाप्रकारे हार्दिकच्या स्फोटक खेळीचा शेवट झाला.
Leave a Reply