
या अभिनेत्रीने २०११ मध्ये लग्न केल्यानंतर २०१२ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तर त्यापूर्वी तिने अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले होते. त्यामुळे जेव्हा तिच्या बॉलिवूडमध्ये एंट्रीची बातमी लोकांना कळली तेव्हा तिला विरोधाचा सामना करावा लागला होता. आता तुम्ही देखील विचार करत असाल ही अभिनेत्री आहे तरी कोण? तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री करण्याआधी प्रचंड मेहनत घेतली होती.
आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून सनी लिओन आहे. सनी लिओनने लहान वयातच वृत्तपत्र विकण्यापासून ते बर्फ काढण्यापर्यंत अनेक प्रकारची कामे केली होती.सनीचे खरे नाव करनजीत कौर वोहरा आहे. तिचा जन्म कॅनडामध्ये १३ मे १९८१ रोजी झाला. सनीने एका मुलाखतीत सांगितले होते की तिला लहानपणापासूनच तिच्या पालकांनी स्वावलंबी होण्यासाठी सांगितले होते.
पालकांच्या सांगण्यानुसार सनी लिओनने लहान वयातच काम सुरू केले. तिने घरावरील बर्फ काढण्यापासून ते लिंबू सरबत विकण्यापर्यंतचे काम केले आहे. तर गुजराणासाठी अभिनेत्रीला वृत्तपत्रही विकावे लागले होते. कॅनडामध्ये जन्मलेली सनी कधीकाळी अमेरिकेतही राहत होती. येथून तिने शालेय शिक्षण घेतले. तिच्याकडे कॅनडाबरोबरच अमेरिकेचेही नागरिकत्व आहे. मात्र काही वर्षांपूर्वी सनी भारतात स्थायिक झाली आहे.
सनीने २०१२ मध्ये आलेल्या 'जिस्म २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १३ वर्षांच्या करिअरमध्ये तिने 'रागिनी एमएमएस २', 'एक पहेली लीला', 'मस्तीजादे' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तर 'लैला मैं लैला', 'बेबी डॉल' आणि 'पिंक लिप्स' यांसारख्या आयटम सॉंग्सने सर्वांना थक्क केले. अभिनेत्रीव्यतिरिक्त सनीची ओळख आता बिझनेसवुमन म्हणूनही आहे. तिने २०१८ मध्ये क्रूएल्टी-फ्री कॉस्मेटिक ब्रँड स्टार स्ट्रक लाँच केला होता. २०२१ मध्ये अभिनेत्रीने पेटा-अप्रूव्ड व्हीगन अॅथलेटिक ब्रँडमध्येही गुंतवणूक केली होती.
सनी लिओनच्या नेटवर्थबद्दल बोलायचे झाले तर सेलिब्रिटी नेटवर्थच्या रिपोर्टनुसार तिची एकूण संपत्ती सुमारे ११५ कोटी रुपये आहे. तिच्याकडे मुंबईबरोबरच अमेरिकेतही आलिशान घर आहे. तर अभिनेत्रीच्या कार कलेक्शनमध्ये मासेराती घिबली नेरिसिमो, मासेराती क्वाट्रोपोर्टे, बीएमडब्ल्यू ७ सीरीज आणि ऑडी ए५ यांचा समावेश आहे.




Leave a Reply