• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Green Card Review : एका अफगाणी नागरिकाच्या चुकीची शिक्षा अमेरिकेत राहणाऱ्या 18 देशांच्या नागरिकांना भोगावी लागणार, यात भारत आहे का?

November 28, 2025 by admin Leave a Comment


व्हाइट हाऊसच्या बाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर अमेरिकी प्रशासन Action मोडमध्ये आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानंतर अमेरिकी एजन्सी US मध्ये वास्तव्य करणाऱ्या अफगाणिस्तानसह 19 देशांच्या नागरिकांची चौकशी करणार आहे. या नागरिकांच्या वास्तव्यात काही चुकीच आढळल्यास त्यांना तात्काळ त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल. ‘जो आपल्या फायद्याचा नाही, तसा एकही नागरिक अमेरिकेत राहणार नाही’ असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलय. व्हाइट हाऊसच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली. त्याचा आरोप अफगाणिस्तानचा नागरिक रहमुल्लाहवर आहे. या गोळीबारात अमेरिकेचा एक सैनिक शहीद झाला. एक जवान गंभीररित्या जखमी झाला.

राष्ट्रपती बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टीने 19 देश चिंताजनक होते. त्यांच्यावर कारवाई करण्याचं सूतोवाच केलं होतं. या देशांच्या वीजावरही कारवाई झाली होती. अफगाणिस्तानचा नागरिक रहमुल्लाहने व्हाइट हाउसबाहेर गोळीबार केल्यानंतर या देशाच्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ज्या देशांच्या लोकांवर कारवाईची तयारी आहे, त्यात भारताचा शेजारी म्यानमार सुद्धा आहे. म्यानमारचा सुद्धा अमेरिकेने चिंताजनक देशांच्या यादीत समावेश केला आहे.

चिंताजनक देशांच्या यादीत कुठले-कुठले देश?

म्यानमार आणि अफगानिस्तान शिवाय चाड, कांगो गणराज्य, इक्वेटोरियल गिनी, हैती, इराण, येमेन, लीबिया, सोमालिया, बुरुंडी, लाओस, सिएरा लियोन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि वेनेजुएला हे देश सुद्धा या यादीमध्ये आहेत.
या 19 देशांच्या नागरिकांची ओळख पटवून त्यांना डिपोर्ट करण्याचे अमेरिकन सुरक्षा पथकाच्या जवानांना निर्देश दिले आहेत.

ग्रीन कार्ड कोणाला दिलं जातं?

न्यूजवीक मॅगजीननुसार, अमेरिकी प्रशासनाच्या या आदेशाचा थेट परिणाम 2 लाख 33 हजार लोकांवर होईल. यात बहुतांश अफगाणी आहेत. जे 2021 साली अफगाणिस्तानातून पळून अमेरिकेत गेले. अमेरिकन नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवेचे प्रमुख जोसेफ एडलो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, ‘संयुक्त राज्य अमेरिकेच्या चिंताजनक देशांच्या यादीत येणार्‍या प्रत्येक परदेशी नागरिकाची कठोर चौकशी करण्यात येईल’ ग्रीन कार्ड शरणार्थींना दिलं जातं. बायडेन यांच्या प्रशासनात 5 लाख लोक शरणार्थी होते. आता त्यांची संख्या कमी झाली आहे. ट्रम्प मेक अमेरिका, ग्रेट अमेरिका अभियानातंर्गत शरणार्थींना आपल्या देशातून हटवत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘मी लियोनल मेस्सीची…’, चाहत्यांच्या गोंधळानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा माफीनामा
  • जया बच्चन यांची वागणूक पाहून संतापली हुमा कुरेशी, पॅपराजींशी संबंधीत त्या वक्तव्याला दिले सडेतोड उत्तर
  • मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा धक्का, व्हिसाबाबत घेतला खळबळजनक निर्णय, होणार मोठा परिणाम
  • अंडी, चिकन खात नाही का? प्रोटीनसाठी ‘या’ गोष्टी खा, जाणून घ्या
  • Amitabh Bachchan : मला नाही माहिती मी असं काय केलंय ज्यामुळे…., अभिताभ बच्चन का झाले इतके भावुक? Video व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in