
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांपासून दरांनी उसळी घेतली असून, सोन्याचा दर सुमारे साडेचार हजार रुपयांनी वाढला आहे, तर चांदीचा दर तब्बल पंधरा हजार रुपयांनी वाढला आहे. या वाढीमुळे सोन्याने १ लाख ३० हजार रुपयांचा, तर चांदीने १ लाख ७० हजार रुपयांचा आकडा पार केला आहे. या वाढीचे मुख्य कारण फेडरल रिझर्वने व्याजदर कमी करणे हे असल्याचे सराफ व्यावसायिक सागर दादा यांनी सांगितले. यामुळे गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. लग्न सराईच्या दिवसांमध्ये ही दरवाढ वऱ्हाडी मंडळींच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे. ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात दागिने मिळत आहेत, ज्यामुळे त्यांच्या चिंता वाढल्या आहेत. दिवाळीत दर वाढून नंतर घसरले होते, मात्र आता पुन्हा वाढल्याने ग्राहक त्रस्त आहेत.
Leave a Reply