
ऑपरेशन थिएटरच्या परिसरात गेलं तुम्हाला सगळीकडे हिरव्या आणि निळ्या रंगाचे कपडे दिसतात. तुम्हाला डॉक्टर आणि नर्सेसच्या अगांवर एक तर निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे आढळतात. अनेकांना वाटते की अशा रंगाचे कपडे परिधान करणे हा एक प्रथा आणि परंपरेचा भाग आहे.
मात्र हिरव्या आणि निळ्या रंगाच्या कपड्यांमागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. याच कारणांमुळे ऑपरेशन थिअटरमध्ये निळा आणि हिरव्या रंगाचेच कपडे वापरतात. अगोदर डॉक्टर तसेच इतर स्टाफ ऑपरेशन करताना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचा.
20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पांढरा रंग हा स्वच्छता आणि पवित्रतेचे प्रतिक मानला जायचा. त्यामुळेच डॉक्टर ऑपरेशन करताना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे. मात्र 1914 सालानंतर ऑपरेशन करताना पांढऱ्या कपड्यांवर रक्त लागते. त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळेच हळूहळू पांढरा रंग वगळून हिरव्या आणि निळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यास सुरुवात झाली.
लाल रंगाकडे सलग पाहिले की मानवी डोळ्यांना कलर फटीगचा त्रास सुरु होतो. मात्र सलग लाल रंग पाहिला की डोळे थकून जातात. ऑपरेशन करताना रुग्णाच्या अंगातून सतत रक्त येत असते. यामुळे डोळ्यांपुढे सतत लाल रंगच दिसतो. म्हणूनच डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून डॉक्टर निळ्या आणि लाल रंगाचे कपडे परिधान करतात.
निळा आणि हिरवा रंग फक्त डोळ्यांनाच नव्हे तर मेंदुलादेखील आराम देण्यास मदत करतो. हे दोन्ही रंग तणाव कमी करतात. ऑपरेशन करताना ते यशस्वी व्हावे याचा तणाव डॉक्टरांवर असतो. त्यामुळेच अशा स्थितीत निळ्या आणि हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यास मानसिक शांती मिळण्यास मदत होते.




Leave a Reply