
उसेन बोल्ट : उसेन बोल्ट हा जगातील सर्वात वेगवान मानव आहे, त्याने 2009 मध्ये बर्लिन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत 100 मीटर अंतर केवळ 9.58 सेकंदात पूर्ण करून विश्वविक्रम प्रस्थापित केला.
ताशी वेग : धावताना बोल्टचा सर्वाधिक वेग 44.72 किमी प्रति तास इतका नोंदवण्यात आला आहे. मानवी इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक धावण्याची गती आहे.
200 मीटरमध्येही किंग : 100 मीटरप्रमाणेच 200 मीटर शर्यतीतही त्याचा दबदबा आहे. त्याने हे अंतर 19.19 सेकंदात पूर्ण करून तिथेही जागतिक विक्रम नोंदवला आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदके : बोल्टने सलग तीन ऑलिम्पिक खेळांमध्ये (2008 बीजिंग, 2012 लंडन, 2016 रिओ) 100 मीटर आणि 200 मीटर अशा दोन्ही स्पर्धांत सुवर्णपदके जिंकली आहेत.
जमैकाचा सुपूत्र : उसेन बोल्टचा जन्म 21 ऑगस्ट 1986 रोजी जमैका या कॅरिबियन देशात झाला. जमैका हा देश जगप्रसिद्ध धावपटू निर्माण करण्यासाठी ओळखला जातो. बोल्टची उंची 6 फूट 5 इंच आहे. बोल्टच्या लांब पावलांमुळे त्याला इतरांपेक्षा कमी पावले टाकून जास्त अंतर पार करणे सोपे जाते.




Leave a Reply