
विमानात प्रवाशांना मदत करणाऱ्या एअर होस्टेसचा गणवेश विचारपूर्वक डिझाइन केला जातो. यातील प्रत्येक रंग, प्रत्येक कापडाचा खास असा अर्थ असतो. त्यांनी गळ्यात घातलेला स्कार्फला देखील खास महत्त्व आहे.
गळ्यातील स्कार्फ केवळ सुंदर दिसण्यासाठी डिझाइन केलेले नाही, तर विमानात काम करण्याच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी स्कार्फ असते. यामध्ये एअरलाइनचा लोगो आणि ब्रँड थीमशी जुळणाऱ्या रंगाचे स्कार्फ तयार केले जातात. प्रवाशांना एअरलाइनचे नाव आठवत नसेल, त्यावेळी स्कार्फचा रंग त्यांना नावाची आठवण करून देतो. ही एक ब्रँडिंग स्ट्रॅटेजी आहे.
लांबच्या प्रवासावेळी विमानातील तापमान अनेकदा थंड असते, प्रवाशांसाठी हे सोयीस्कर असू शकते, मात्र जास्त वेळ काम करणाऱ्या एअर होस्टेससाठी ते त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे थंड हवामानापासून गळ्याचे संरक्षण करण्यासाठी या स्कार्फचा उपयोग होतो.
गळ्यातील हा स्कार्फ एअर होस्टेसच्या व्यक्तिमत्वातील दर्जा वाढवतो. यामुळे त्या संयमी, शिस्तबद्ध असल्याचे दिसून येते. गणवेशासह स्कार्फ घालल्याने त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वास दिसून येतो.
स्कार्फ आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतो. गरज पडल्यास त्याचा वापर पट्टी म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान एअर होस्टेसला याबाबत प्रशिक्षण देखील दिले जाते.




Leave a Reply