
नृत्यांगना गौतमी पाटील यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ भव्य रोड शो केला. या प्रचार रॅलीला नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गौतमी पाटील यांनी रोड शोमध्ये सहभाग घेतला होता. चंद्रपूरच्या मूल शहरातील ही दृश्ये पाहताना नागरिकांचा उत्साह स्पष्ट दिसत होता.
गौतमी पाटील यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, काहीजण सेल्फी घेण्यासाठीही पुढे सरसावले होते. गौतमी पाटील यांनी या प्रचार सभेबद्दल बोलताना सांगितले की, त्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. दरवेळी प्रेम मिळते, पण यावेळी गर्दी प्रचंड असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला वर्गाची उपस्थितीही लक्षणीय होती. गौतमी पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांचे आभार मानत, निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी प्रचार करत असल्याचे सांगितले. मूल शहरातील जनतेला त्यांनी “एकता ताई” यांना भरभरून प्रेम आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
Leave a Reply