
2023 मध्ये हिंडनबर्गने अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. गौतम अदानी समूहाची त्यानंतरही मोठी घोडदौड दिसून आली. जानेवारी 2023 पासून आतापर्यंत अदानी समूाच्या व्यवसायात जवळपास 80,000 कोटी रुपये गुंतवून 33 कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत.
अदानी समूहाने बंदरे प्रकल्पात जवपास 28,145 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन अनेक कंपन्या विकत घेतल्या. तर सिमेंट उद्योगात 24,170 कोटी रुपये तर ऊर्जा क्षेत्रात 12,251 कोटींचे अधिग्रहण केले आहे. याशिवाय सुरुवातीचे व्यवसायिक भांडवल म्हणून 3,927 कोटी रुपये गुंतवले आहे.
अद्यापही अनेक उद्योगात अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. नवीन कंपन्या खरेदी करण्यासाठी अदानी समूहाची रणनीती ठरली आहे. अदानी समूहाने काही कर्ज, दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्या खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नवीन कंपन्या त्यांच्या ताफ्यात असतील.
अदानी समूह गेल्या काही दिवसांपासून बंदरे, सिमेंट आणि ऊर्जा क्षेत्रा दबदबा तयार करत आहे. या क्षेत्रातील अनेक कंपन्या त्यांनी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अनेक प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहे. तर नवीन गुंतवणूकही वाढली आहे. देशातील अनेक नवे प्रकल्प अदानी समूहाच्या खात्यात जमा होत आहे.
तर सिमेंट क्षेत्रात अंबुजा सिमेंट, रवी सांघी कुटुंबाची सांघी इंडस्ट्रीजमधील वाटा यास गेल्या वर्षी ACC कंपनीची खरेदी यामुळे या उद्योगात अदानी समूहाचा चांगलाच दबदबा तयार झाला आहे.सिमेंट उद्योगात अदानी समूहाने मांड ठोकली आहे. हा समूह प्रमुख उत्पादक आणि वितरक ठरला आहे.
या नवीन घाडमोडींमुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे. हिंडनबर्गच्या आरोपांमुळे अदानी समूहातील अनेक शेअर्स दणकावून आपटले होते. ज्यांनी त्यावेळी या समूहाचे शेअर खरेदी केले. त्यांचा मोठा फायदा झाला आहे. त्यांच्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळाला आहे.





Leave a Reply