
हा शुक्रवार ओटीटी प्रेमींसाठी धमाकेदार राहणार आहे. खरे तर अनेक नव्या चित्रपट आणि मालिका या शुक्रवारी ओटीटीच्या विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. ओटीटी प्रेमींसाठी प्रत्येक शनिवार हा अतिशय खास असतो. खरे तर प्रत्येक शुक्रवारी विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर नवे चित्रपट आणि सीरिज रिलीज होतात. हा शुक्रवारही ओटीटीवर खूपच दमदार राहणार आहे. कारण १९ डिसेंबर २०२५ रोजी विविध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रोमांचक क्राइम थ्रिलरपासून सस्पेन्सने भरलेले ड्रामा आणि मनोरंजक रोमँटिक कॉमेडीने परिपूर्ण चित्रपट व मालिका रिलीज होणार आहेत. चला, या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या नव्या चित्रपट आणि शोजची संपूर्ण यादी पाहूया…
रात अकेली है: द बंसल मर्डर्स
रात अकेली है: द बंसल मर्डर्स ही एक रोमांचक क्राइम थ्रिलर आहे ज्यात नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे आणि चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत आहेत. कथा इन्स्पेक्टर जतिल यादव यांच्या भोवती फिरते. ते कानपूरमधील आलिशान बंगल्यात घडलेल्या श्रीमंत आणि प्रभावशाली बंसल कुटुंबाच्या क्रूर सामूहिक हत्याकांडाची चौकशी करत असतात. जसजसा तपास पुढे सरकतो, तसतसे त्यांचा विश्वासघात आणि एक प्राणघातक कटाच्या रहस्यांचा उलगडा होतो. हा धमाकेदार थ्रिलर तुम्ही १९ डिसेंबर, शुक्रवारी नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
फोर मोर शॉट्स प्लीज!
फोर मोर शॉट्स प्लीज! चा चौथा आणि शेवटचा सीझन चार मुख्य पात्रांच्या सिद्धी, दामिनी, अंजना आणि उमंग यांच्या कथेला पुढे नेतो. या सिझनमध्ये त्यांना सर्वात मोठी तडजोट करावी लागते. ही तडजोड त्यांना अनेक सत्यांचा सामना करण्यास आणि सहा महिन्यांच्या आत आपले जीवन सुधारण्यास भाग पाडतो. या रोमँटिक कॉमेडी-ड्रामात सयानी गुप्ता, कीर्ती कुल्हारी, बानी जे आणि मानवी गागरू यांनी कमबॅक केले आहे. ही सीरिज तुम्ही १९ डिसेंबर, शुक्रवारी प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
द ग्रेट फ्लड
दक्षिण कोरियाची ही सायन्स फिक्शन डिझास्टर मूवी आहे. या सिनेमात किम दा मी, पार्क हे सू आणि क्वोन यून सेओंग यांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाची कथा एक एआय संशोधकाच्या भोवती फिरते, ज्याच्याकडे मानवतेच्या भविष्याची सर्व मुळे आहेत. एक विनाशकारी जागतिक पूरामुळे जेव्हा संपूर्ण जग पाण्याखाली जाते, तेव्हा तो आणि त्याचा लहान मुलगा एक बुडणाऱ्या इमारतीत अडकतात. कथा त्यांच्या जगण्याच्या संघर्षावर केंद्रित आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.
नयनम
नयनम हा एक जबरदस्त सायकोलॉजिकल साय-फाय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा एक नेत्ररोग तज्ज्ञाच्या आयुष्याभोवती फिरते. तो गरजू लोकांसाठी एक आय क्लिनिक चालवतो आणि त्याचबरोबर असे प्रयोग करतो जे वास्तव आणि महत्वाकांक्षा यांच्यातील रेषा धूसर करतात. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म झी५ वर या शुक्रवारी पाहू शकता.
मिसेस देशपांडे
माधुरी दीक्षित स्टारर ‘मिसेस देशपांडे’ ही एक अतिशय रोमांचक क्राइम थ्रिलर सीरिज आहे. या सीरिजमध्ये २५ वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या एका सीरियल किलरची कथा दाखवली गेली आहे. पोलिस तिच्याशी संपर्क साधतात आणि तिच्याच पद्धतीने गुन्हा करणाऱ्या एका नव्या हत्याऱ्याला पकडण्यासाठी मदत मागतात. ही सीरिज फ्रेंच सीरिज ‘ला मांटे’ पासून प्रेरित आहे. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म जियो हॉटस्टारवर १९ डिसेंबर, शुक्रवारी प्रदर्शित होते.
Leave a Reply