• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Friday OTT Release: धमाकेदार शुक्रवार! आज ओटीटीवर प्रदर्शित होणार नवे सिनेमे आणि सीरिज, विकेंडला नक्की पाहा

December 12, 2025 by admin Leave a Comment


शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी ओटीटीच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर अनेक धमाकेदार चित्रपट आणि सीरिज रिलीज होत आहेत. मजेशीर गोष्ट अशी की यावेळी सस्पेन्स थ्रिलरपासून ते फॅमिली एंटरटेनर आणि एक्सायटिंग मिस्ट्री-क्राइमपर्यंत वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट आणि सीरिज धुमाकूळ घालायला येत आहेत ज्या तुमचा वीकेंड मजेशीर बनवतील. चला, जाणून घेऊया जिओ हॉटस्टारपासून ते नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओपर्यंत सर्व प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या नव्या चित्रपट आणि सीरिज विषयी…

एफ१ द मूवी

ब्रॅड पिटचा स्पोर्ट्स सिनेमा एफ१ द मूवीची कथा १९९० च्या दशकातील एका निवृत्त ड्रायव्हरभोवती फिरते, ज्याचे करिअर एका जीवघेण्या अपघातानंतर जवळजवळ संपले होते. अनेक वर्षांनंतर, त्याला पुन्हा स्वप्न जगण्याची संधी मिळते. त्याचा जुना मित्र फॉर्म्युला १ टीमचा मालक आहे, त्याला ट्रॅकवर परत येऊन एका नव्या ड्रायव्हरसोबत रेस करण्याची संधी देतो. चित्रपटामध्ये जेवियर बार्डेम, केरी कोंडन आणि डॅमसन इड्रिसही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एफ१ द मूवी हा शुक्रवारी अॅपल टीव्ही+ वर रिलीज होत आहे.

थ्री रोजेस सीझन २

थ्री रोजेस सीझन २ ही मुंबईतील तीन मैत्रिणींची कथा आहे. एक अॅड एजन्सी सुरू करतात, पण फ्रान्सहून परतलेल्या एका धोकादायक गँगस्टरच्या जाळ्यात अडकतात. यात ईशा रेब्बा, राशी सिंग आणि कुशिता कल्लापु मुख्य भूमिकेत आहेत, तर हर्षा चेमुडु आणि सत्यानेही महत्त्वाचे रोल केले आहेत. ही सीरिज या शुक्रवारी, १२ डिसेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म अहा वर पाहता येईल.

कांथा

कांथा हा २०२५ मध्ये रिलीज झालेला तमिल पीरियड ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा १९५० च्या दशकातील मद्रासमधील आहे. हा चित्रपट दिग्गज दिग्दर्शक अय्या (समुथिरकानी) आणि त्यांच्या सुपरस्टार शिष्य टी.के. महादेवन (दुलकर सलमान) यांच्यातील एका सिनेमा प्रोजेक्टवरून झालेल्या अहंकाराच्या संघर्षावर आधारित आहे. ही लढाई नंतर एका हत्येच्या रहस्यात बदलते. एक इन्स्पेक्टर (राणा दग्गुबाती) सेटची तपासणी करतो. कांथा हा चित्रपट १२ डिसेंबर, शुक्रवारपासून नेटफ्लिक्सवर पाहता येत आहे.

साली मोहब्बत

साली मोहब्बत हा एक सस्पेन्स थ्रिलर आहे. चित्रपटात स्मिता (राधिका आप्टे) नावाच्या छोट्या शहरातील गृहिणीची कथा दाखवली आहे. तिचा पती आणि चुलत भावाचा मृतदेह सापडल्यानंतर तिचे साधे-सुधे आयुष्य उघडे पडते आणि ती दुहेरी हत्याकांडात मुख्य संशयित बनते. या प्रकरणाची तपासणी पोलीस अधिकारी रतन पंडित (दिव्येंदु) करतो. हा टिस्का चोपडा दिग्दर्शित पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट या शुक्रवारपासून ओटीटी प्लॅटफॉर्म झी५ वर प्रदर्शित झाला आहे.

सिंगल पापा

सिंगल पापा ही अशी सीरिज आहे ज्यात कुणाल खेमू गौरव गहलोत (जीजी) ची भूमिका करत आहेत, जो एक “बचकाना” व्यक्ती आहे आणि घटस्फोटानंतर लगेच मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेऊन कुटुंबाला धक्का देतो. त्याच्या या निर्णयामुळे त्याला एकट्यानेच मुलाची देखभाल करावी लागते. यात प्राजक्ता कोळी, मनोज पाहवा आणि आयशा रझाही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिंगल पापा ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर या शुक्रवारपासून पाहता येईल.

द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली

द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली ही एक मनोरंजक कॉमेडी सीरिज आहे जी बानी अहमद नावाच्या युवा लेखिकेच्या आयुष्याची कथा सांगते. अनुषा रिझवी दिग्दर्शित या सीरिजमध्ये कृतिका कामरा, श्रेया धनवंतरी, शीबा चड्ढा आणि फरीदा जलाल यांनी अभिनय केला आहे. कथा बानी (कृतिका) नावाच्या लेखिकेभोवती फिरते, तिचे कुटुंब वेगळे झाल्यामुळे तिला एका महत्त्वाच्या डेडलाइनचा सामना करावा लागतो, ज्यामुळे तिला काम आणि कौटुंबिक संकटांमध्ये संतुलन साधावे लागते. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर या शुक्रवारपासून पाहाता येणार आहे.

वेक अप डेड मॅन: अ नाइफ्स आउट मिस्ट्री

वेक अप डेड मॅन: अ नाइफ्स आउट मिस्ट्रीमध्ये जासूस बेनोइट ब्लँकची कथा दाखवली आहे. तौ न्यूयॉर्कमधील एका धार्मिक समुदायात करिश्माई पादरी मॉन्सिग्नोर जेफरसन विक्स (जोश ब्रोलिन) यांच्या बंद खोलीत झालेल्या हत्येची तपासणी करत आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर या शुक्रवारपासून स्ट्रीम होत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आनंदी आयुष्यासाठी पती-पत्नीने रोज ही गोष्ट केलीच पाहिजे, चाणक्य काय म्हणतात?
  • Squash World Cup: 29 वर्षात भारताने पहिल्यांदाच मिळवलं जेतेपद, या खेळाडूंमुळे झालं शक्य
  • CIA चे हिमालयातील ते गुप्त मिशन, 60 वर्षानंतरही भारतासाठी का आहे धोकादायक ?
  • अपघातानंतर महिमा चौधरीचा चेहरा विद्रूप झाला होता; अनेक चित्रपट गमवावे लागले
  • American Tariff : टॅरिफ दबावात भारताची मोठी झेप, गेल्या 10 वर्षांमध्ये जे जमलं नाही ते आता घडलं, अमेरिकेला मोठा हादरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in