• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Fish Vs Chicken: मासे भारी की चिकन सर्वात बेस्ट, जास्त प्रोटीन नेमके कशात असतात?

December 1, 2025 by admin Leave a Comment


मासे आणि चिकन यांच्यात बराच फरक आहे. मासे समुद्रातून येतात, तर कोंबडी ही जमिनीवर वाढवलेली असते. माशाचं मांस अतिशय मऊ आणि पापुद्रे तुटतात तसे फ्लेकी असतं, तर चिकनचे थोडे कणखर आणि चघळायला जरा जाड वाटते. चिकनचा स्वाद तटस्थ असल्यामुळे मसाले, सॉस, मॅरिनेड घालून हव्या तशा चवी बनवता येतात. माशाचा स्वाद मात्र त्याला त्याचा स्वतःचा मासळीचा, कधी गोडसर तर कधी हलका बटरसारखा असतो.

मासे आणि चिकन यांच्यात बराच फरक आहे. मासे समुद्रातून येतात, तर कोंबडी ही जमिनीवर वाढवलेली असते. प्राथमिक फरक म्हणजे चव आणि पोत. मासे चिकनपेक्षा मऊ असतात. त्यात स्नायू तंतू असतात. मासे खाताना, ते सहसा खूप मऊ लागतात. चिकनला तटस्थ चव असते, कारण त्याची चव थोडीशी वेगळी असते. चिकन हे विविध मसाले, सॉस आणि मॅरीनेड्स करुन उत्कृष्ट बनता येते. दुसरीकडे, माशांना एक अद्वितीय चव असते. चव साधारणपणे तुम्ही कोणत्या प्रकारचा मासा खाता यावर अवलंबून असते. तसेच, ते गोड असू शकतात आणि सौम्य बटरसारखे देखील लागू शकतात.

कॅलरीच्या बाबतीत साल्मन आणि ट्यूना सारखे मासे जास्त कॅलरीचे असतात. तळल्यावर मग चिकन असो की मासे, दोन्हींच्या कॅलरी आणि चरबीत प्रचंड वाढ होते.

कशात आहे जास्त प्रोटीन?

प्रोटीनच्या बाबतीत मात्र चिकन ब्रेस्टचा सर्वात उत्तम. शंभर ग्रॅम बिनहाडाच्या चिकन ब्रेस्टमध्ये साधारण 31 ग्रॅम प्रोटीन मिळतं, तर बहुतांश माशांमध्ये 20 ते 25 ग्रॅमच्या आसपास प्रोटीन असतं. म्हणजे फक्त प्रोटीन आणि कमी कॅलरी हवी असेल तर चिकन पुढे आहे.

मासे खावेत की चिकन?

पण जेव्हा एकूण आरोग्याचा विचार करतो तेव्हा मासे सरस ठरतात. कारण माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुबलक असतं, जे आपलं शरीर स्वतः बनवू शकत नाही. हे हृदयाचे आजार, सूज, तणाव कमी करतं, ट्रायग्लिसराइड्स नियंत्रणात ठेवतं आणि मेंदूच्या आरोग्यासाठीही उत्तम असतं. त्यातच व्हिटॅमिन डी, आयोडीन आणि सेलेनियमही माशांमध्येच जास्त प्रमाणात मिळतं.

थोडक्यात, जर फक्त जास्त प्रोटीन आणि कमी कॅलरी हवी असेल तर चिकन ब्रेस्ट उत्तम पर्याय आहे. पण हृदय, मेंदू, डोळे आणि दीर्घकाळच्या आरोग्यासाठी मासे निश्चितच सरस ठरतात. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहारात समाविष्ट करणं हे सर्वोत्तम आहे. आठवड्यातून दोन-तीन वेळा मासे आणि बाकी दिवशी चिकन असं संतुलन केलंत तर प्रोटीन तर मिळेलच पण ओमेगा-३ सारखे अनमोल पोषकतत्त्वही मिळतील. निवड तुमच्या गरजेवर अवलंबून आहे!



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अंड्यात लपलेल्या विषामुळे कॅन्सरचा धोका, नायट्रोफ्यूरान अँटीबायोटिक कशात? कसे ओळखावे?
  • शैक्षणिक खर्च वाढला, मुलांच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली, जाणून घ्या
  • सोन्याच भाव धडाम! एका झटक्यात 2000 रुपयांनी स्वस्त, आता 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?
  • IPL Auction: पृथ्वी शॉ पुन्हा एकदा Unsold, आपल्या पोस्टने लक्ष घेतलं वेधून
  • वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या या 5 गोष्टी गरीबी आणू शकतात; तुमच्याही बाथरूममध्ये आहेत का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in