• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Explainer : देशाच्या नव्या भूकंप नकाशाने खळबळ, 75 टक्के लोकसंख्या डेंजर झोनमध्ये?, पाहा काय आहे इशारा

December 22, 2025 by admin Leave a Comment


पृथ्वी 4 थरांपासून म्हणजे लेयर्सपासून मिळून बनलेली असते. ज्यात इनर कोअर, आऊटर कोअर, मेटल आणि सर्वात वरती लेअर क्रस्ट आहे. याच क्रस्टमध्ये टेक्टोनिक प्लेट्स असते. ज्याची आपसात टक्कर झाल्याने वा तिच्या जागेवर सरकल्याने भूकंप येतो. 4.6 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वी तयार झाली होती, तेव्हा याच प्लेटच्या टक्करीने उंच डोंगर आणि पर्वत तयार झाले. हिमालयीन रेंज देखील यापैकी एक आहे. परंतू आता भारताने नवा नकाशा जारी केला आहे. ज्यात हिमालयीन रेंजची प्लेट्स 200 वर्षांपासून सरकलेली नाही. म्हणजे कोणत्याही क्षणी मोठा भूकंप येऊ शकतो. तसेच देशाची 75 लोकसंख्या नवीन डेंजर झोन VI मध्ये रहात आहे. चला तर जाणून घ्या भारताचा नवा भूकंपाचा नकाशा काय आहे. त्यात मोठे बदल काय आहेत आणि पुढे काय होणार आहे.

 भारताचा नवा भूकंप जोखीम नकाशा काय आहे ?

भारत सरकारची संस्था ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने (BIS) नवा भूकंप जोखीम नकाशा जारी केला आहे. हा नकाशा ‘IS 1893 (Part 1): 2025’ नावाच्या कोडचा हिस्सा आहे. आणि जानेवारी 2025 पासून संपूर्ण देशात तो लागू झाला आहे. याचे पूर्ण नाव ‘सीस्मिक झोनेशन मॅप’ असे आहे. जो देशाचे भूकंपाच्या धोक्यानुसार वर्गीकरण करतो. जुना नकाशा साल 2002 चा होता, जो साल 2016 मध्ये थोडा अपडेट झाला होता. परंतू आता हा नवा नकाशा अधिक अचूकपणे तयार केला आहे. याचा हेतू नवीन बिल्डींग्स, ब्रिज, हायवे आणि मोठे प्रोजेक्ट्सना भूकंपापासून वाचवणे हा आहे. म्हणजे कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट्स भूकंपात पडून नयेत आणि वित्तीय आणि जिवीतहानी कमी होईल. BIS ने म्हटले आहे की सर्व इंजिनिअर्सना या नव्या नकाशाचा वापर करावा.

जुन्या नकाशाच्या तुलनेत नवीन नकाशा किती वेगळा आहे ?

उत्तर – आधी भारताला चार मुख्य झोनमध्ये वाटले होते…

झोन II- कमी धोका

झोन III- मध्यम धोका

झोन IV- जास्त धोका

झोन V- सर्वात जास्त धोका

आधी झोन I देखील होता. परंतू त्यास झोन II मध्ये सामावण्यात आले आहे. आता नवा नकाशा देखील याच चार झोनचाच आहे. परंतू सर्वात जास्त धोका असलेला झोन V ला अधिक ताकदीने परिभाषित केले आहे. यास अल्ट्रा-हाय रिस्क वा झोन VI सारखे मानले जात आहे. कारण याचा धोका पहिल्यापेक्षा जास्त मानला जात आहे. एकूण मिळून देशाचा 61% भाग आता मध्यमहून अधिक धोक्याच्या झोन III मधून VI मध्ये आला आहे. आधी हा 59% होता. तसेच देशाची 75% लोकसंख्या सर्वात धोका असलेल्या भागात रहाते. नव्या नकाशात हा बदल प्रोबेबिलिस्टिक सीस्मिक हेजर्ड असेसमेंट (PSHA) पद्धतीने केला आहे. जो जुन्या ऐतिहासिक डेटाहून चांगला आहे.

 नव्या नकाशात हिमालया संदर्भात काय मोठा बदल ?

सर्वात मोठा बदल हिमालयाच्या संपूर्ण इलाक्यात झाला आहे, ज्यास हिमालयन आर्क म्हणतात. आधी हिमालयाचा काही भाग झोन IV मध्ये होता आणि काही भाग झोन V मध्ये होता. परंतू आता कश्मीर ते अरुणाचल प्रदेशापर्यंत सारा पहाडी इलाका एकाच सर्वात जास्त धोका असलेल्या झोन VI मध्ये टाकण्यात आला आहे. वाडिया इन्स्टीट्यूट ऑफ हिमालय जिओलॉजी डायरेक्टर विनीत गहलोत यांनी म्हटले आहे की आधीचा जुना नकाशा हिमालयाच्या लॉक सेगमेंट्सला नीट समजत नव्हता, जेथे 200 वर्षांपासून तणाव जमा होत होता. आता हा नकाशा फॉल्ट लाईन्स, मॅग्निट्यूड आणि मातीचा प्रकार पाहून तयार केला आहे. त्यामुळे हिमालयाच्या आजूबाजूचा मैदानी प्रदेश उदा.डेहराडून, हरिद्वार देखील जास्त सतर्क राहतील.

हिमालयात असे का केले आहे, जेथे आधीही भूकंप येत होते ?

हिमालयात भूकंप येत होते. परंतू नव्या संशोधनात कळले की हिमालयाच्या खाली इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट एकमेकांना धडकत आहेत. आणि अनेक जागी प्लेट्स 200 वर्षांपासून लॉक झाली आहे. लॉक म्हणजे ती हलत नाहीए. त्यामुळे तेथे खूप जास्त ताकद जमा झाली आहे. जेव्हा हे लॉक उघडेल, तेव्हा 8 वा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी (NCS) आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (NDMA)चा अहवाल म्हणतो की हिमालयात पुढचा भूकंप कुठेही येऊ शकतो. याच कारणाने BIS ने संपूर्ण हिमालयाला एकाच झोन VI मध्ये टाकले आहे.त्यामुळे येथील इमारतींना मजबूत डिझाईन मिळावी, ज्यामुळे जास्त पिक ग्राऊंड एक्सेलरेशन (PGA)ला झेलू शकेल.

 नव्या नकाशात द. भारत धोक्याच्या बाहेर आहे ?

दक्षिण भारतात खूप कमी बदल आहेत, कारण तेथील जमीन (पेनिनसुलर इंडिया) खूप जुनी आणि स्थिर आहे. येथील टेक्टॉनिक प्लेट्स जास्त एक्टीव्ह नाही. तामिळनाडु, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळचा बहूतांश भाग आता ही झोन II वा III मध्ये आहे. म्हणजे कमी वा मध्यम धोका. नवीन नकाशात तेथील बिल्डींग्स थोड्या जास्त मजबूत बनतील. परंतू हिमालयवाल्या झोन – VI सारख्या जास्त मजबूत नाहीत. परंतू काही किनारी भागात लिक्विफॅक्शन ( मातीची वितळणे ) चा धोका पाहिला गेला आहे.

नवा नकाशा किती विश्वासार्ह ?

हा आता पर्यंतचा सर्वात विश्वासार्ह नकाशा आहे. BIS ने 10 वर्षांच्या संशोधनानंतर यास तयार केला आहे. या संशोधकात वाडिया इन्स्टीट्यूट, NCS आणि इंटरनॅशनल एक्सपर्ट्सचा समावेश होता. जुना नकाशा केवळ जुने भूकंपावर ( उदा. 2001 भुज, 2015 नेपाळ) होता. परंतू नवीन PSHA पद्धतीने तयार केला आहे. यात GPS डेटा, सॅटेलाइट इमेजरी, एक्टिव फॉल्ट्स आणि लाखो सिमुलेशनचा समावेश आहे. ही पद्धत जपान आणि न्यूझीलंड सारख्या देशात वापरली जाते. त्यामुळे आता धोक्याचा अंदाज 2.5% प्रोबेबिलिटी इन 50 इयर्सच्या हिशेबाने असून अधिक अचूक आहे.

आपण भूकंपापासून पूर्ण सुरक्षित होऊ का ?

एक्सपर्ट्सच्या मते संपूर्णपणे सुरक्षित तर कोणी होऊ शकत नाही. परंतू नुकसान 80-90% पर्यंत कमी होऊ शकते. आधी झोन IV-V मध्ये तयार केलेल्या कमजोर इमारती कोसळायच्या.परंतू आता नव्या नियमांमुळे इमारती न हलतील, न कोसळतील. 61% भागात आता भक्कम डिझाईन होईल आणि 75 टक्के लोकसंख्येला फायदा मिळेल. NDMA च्या अहवालानुसार जर आपण जुन्या इमारतींना देखील अपडेट केले तर भविष्यात भूकंपामुळे मृत्यू खूप कमी होतील.

भारतात सर्वात मोठा आणि खतरनाक भूकंप केव्हा आला होता?

2004 मध्ये भूकंप आणि सुनामीने अंदमानचा इंदिरा पॉईंट बुडाला : 26 डिसेंबर 2004 मध्ये इंडोनेशियात आलेल्या भूकंप आणि सुनामीच्या कारणाने अंदमान-निकोबार आयलँडचा इंदिरा पॉईंट बुडाला होता. या भूकंपाने भारत, श्रीलंका आणि इंडोनेशिया सह 14 देशात हाहाकार झाला होता. या भूकंपाने आलेल्या सुनामीने इंदिरा पॉईंटची उंची सुमारे 4.24 मीटरने कमी केली होती. या संकटात 1.7 लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

 2001 मध्ये गुजरातच्या कच्छ भूकंपाने प्रचंड हानी :  2001 मध्ये गुजरातमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप आला होता. ज्याचा फटका गुजरातच्या 24 जिल्ह्यांना झाला. यात सर्वात जास्त नुकसान कच्छ, सुरेंद्रनगर आणि राधनपुर येथे झाले होते. या भूकंपात 7,904 गाव नष्ट झाले होते. सुमारे 17 हजार लोकांचा मृत्यू आणि 1.67 लाख लोक जखमी झाले होते. कच्छ जिल्ह्यातील भूजमध्ये तीन हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू झाला होता आणि 90 टक्के घरांचे नुकसान झाले होते.

204 वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाने भूजमध्ये बनले बेट : साल 1819 मध्ये गुजरातच्या भूजमध्ये झालेल्या भूकंपाने बेट बनले होते. यास अल्लाह बंद नावाने ओळखले जाते. या भूकंपाच्या तीव्रता समजू शकली नाही. परंतू असे म्हटले जाते की 7.8 हून जास्त तीव्रतेच्या भूकंपानंतर अशा प्रकारचे बेट तयार होऊ शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं खळबळ, भारताला मोठा धक्का, भारतीयांच्या नोकऱ्या संकटात
  • व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर करण्यात मदत करतात ही 5 फळे, आहारात नक्की समाविष्ट करा
  • नाभीमध्ये झोपताना ‘हे’ तेल टाकल्यास होतील हजारो फायदे…. पिंपल्सच्या समस्या होतील दूर
  • Baba Venga Prediction : 2026 मध्ये काय काय घडणार? बाबा वेंगांचं भयंकर भाकीत, जगभरात खळबळ
  • Shilpa Shinde: शिल्पा शिंदेने सांगितले 10 वर्षांनंतर पुन्हा ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत येण्यामागचे खरे कारण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in