• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ethiopia Volcano Eruption : 12 हजार वर्षापूर्वीच्या ज्वालामुखी उद्रेकाचे ढग भारतात का आले? कुठल्या मार्गाने आले? विमानाला यापासून काय धोका?

November 28, 2025 by admin Leave a Comment


इथियोपियामध्ये 12000 हजार वर्षापूर्वीच्या जुन्या हायली गुब्बी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्या राखेचे ढग भारताच्या दिशेने येत आहेत. हा ज्वालामुखी इथियोपियाच्या पूर्वी अफार क्षेत्रात आहे. टेक्टॉनिक प्लेट्समुळे ज्वालामुखीच्या हालचाली सामान्य बाब आहे. हा ज्वालामुखी जवळपास मागच्या 12 हजार वर्षापासून निष्क्रिय होता. वैज्ञानिकांनुसार, या ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक होलोसीन युगाच्या (Holocene epoch) सुरुवातीला झालेला. पण 23 नोव्हेंबर 2025 च्या सकाळी या ज्वालामुखीचा स्फोट झाला. अनेक तास या स्फोटांची मालिका सुरु होती. यात राख आणि धुर जवळपास 14 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले.

या ज्वालामुखीमुळे आसपासच्या गावात मोठं नुकसान झालय. अनेक मृत्यू झाले असून पिकांचं नुकसान झालं आहे. हे राखेचे ढग हवेमुळे अफार क्षेत्रापासून लाल सागराच्या दिशेने गेले. असेच हे राखेचे ढग अनेक देश पार करुन भारतापर्यंत पोहोचले आहेत.

ज्वालामुखीच्या ढगापासून विमानाला काय धोका असतो?

25 नोव्हेंबरला म्हणजे आज या राखेच्या ढगांनी भारतात प्रवेश केला. गुजरात, मुंबई फ्लाइट इंफॉर्मेशन रीजन (FIR), आणि दिल्ली-एनसीआर क्षेत्रात या ढगांचा परिणाम दिसून येतोय. भारतातील अनेक शहरात यामुळे हवाई प्रवास बाधित झालाय. अनेक विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. काही फ्लाईटसचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कारण ज्वालामुखीची राख विमानाच्या इंजिनासाठी धोकादायक ठरु शकते.

हे ढग भारतात का आले?

जमिनीवर या राखेच्या ढगांचा काही परिणाम झालेला नाही. वातावरणाच्या वरच्या कक्षेत हे राखेचे ढग राहून निघून जातील. राखेच्या धुरांचे हे ढग नॉर्थईस्ट मॉनसून पॅटर्नमुळे भारतात आले आहेत. या पॅटर्नने ढगांना पूर्वेच्या बाजूला ढकललं.

भारतात येण्यासाठी या ढगांना किती तास लागले?

ज्वालामुखीमुळे निर्माण झालेले राखेचे हे ढग इथियोपिया येथून लाल सागरात तिथून अरेबियन पेनिनसुलामधून येमेन आणि ओमानच्या आकाशातून गेले. नंतर अरबी समुद्रात आले. ग्वादर पाकिस्तानात 60 नॉटिकल मील लांब दिसले. दक्षिण सिंधच्या वर आल्यावर उत्तर-पूर्वेकडे वळले. आता राखेचे हे ढग गुजरात, मुंबई, उत्तर भारत (दिल्ली-एनसीआर) पर्यंत पोहोचले आहेत. 3 ते 4 हजार किमीच अंतर कापून हे ढग भारतापर्यंत आलेत. भारतापर्यंत पोहोचण्यासाठी 18 ते 24 तास लागले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फेस वॉश खरेदी करताना तुम्ही ‘या’ 5 गोष्टी आठवणीने करा चेक, अन्यथा अनवधानाने त्वचेला होईल नुकसान
  • Manikrao Kokate : माणिकरावांनंतर क्रीडा खातं कुणाकडे? 6 नावे चर्चेत, एका नावाने भुवया उंचावल्या
  • Horoscope Today 19 December 2025 : नोकरी करणाऱ्यांवर येईल स्थलांतराची वेळ, मालमत्तेच्या खटल्यात लागणार आज निकाल, या राशींचा शुक्रवार..
  • Weather Update : अनेक शहरांना अलर्ट, धुकं, शीतलहरींचा तडाखा, IMD कडून मोठा इशारा जारी, राज्यातील तापमान…
  • एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा होण्यापूर्वीच डाव साधला, मोठी बातमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in