
अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे. अमेरिकी संसदेच्या हाउस ओवरसाइट कमिटीमध्ये डेमोक्रॅट खासदारांनी एप्सटीनच्या मालमत्तेशी संबंधित 68 नवे फोटो शेअर केले आहेत. हा खुलासा अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा अमेरिकी कायद्यानुसार न्याय विभागाला त्याच्या तपासाशी संबंधित अनक्लासिफाइड फाइल्स जारी करायच्या आहेत. डेमोक्रॅट खासदारांकडून जारी केलेल्या या फोटोंमध्ये अतिशय अस्वस्थ करणारा मजकूर समोर आला आहे. तसेच आता नव्या फोटोंमध्ये अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांचे देखील फोटो समोर आले आहेत.
कोणत्या देशांच्या मुलींच्या पासपोर्टचे फोटो व्हायरल झाले?
काही फोटोंमध्ये एका महिलेच्या शरीरावर काळ्या शाईने ‘लोलिता’ या पुस्तकातील वाक्ये लिहिलेली दिसतात. हे पुस्तक एका १२ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात असलेल्या एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. फोटोंमध्ये महिलेच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर या ओळी लिहिलेल्या दिसतात. याशिवाय अनेक महिलांच्या ओळखपत्रांचेही फोटो समोर आले आहेत, ज्यात नावे लपवलेली आहेत पण देशांचा उल्लेख आहे. ही ओळखपत्रे रशिया, मोरक्को, इटली, चेक रिपब्लिक, दक्षिण आफ्रिका, युक्रेन आणि लिथुआनियाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहेत.
मुलींची बोली लागत होती का?
काही फोटोंमध्ये रात्री उशिराच्या टेक्स्ट चॅटचेही स्क्रीनशॉट आहेत, ज्यात एखाद्या व्यक्तीला एक हजार डॉलरमध्ये मुली पाठवण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे दिसत आहे. फोटोंच्या संपूर्ण संग्रहात ९५,००० फोटो आहेत. यातील ६८ पुन्हा एकदा जारी करण्यात आले आहेत. हा पूर्ण संग्रह एप्सटीनच्या मालमत्तेतून हाउस ओवरसाइट कमिटीला देण्यात आला होता. एका स्क्रीनशॉटमध्ये टेक्स्ट मेसेज दिसतो, ज्यात लिहिले आहे की मी आता मुली पाठवतो आहे. या मेसेजसोबत एखाद्या किशोरीशी संबंधित माहितीही दिसते, मात्र हे स्पष्ट नाही की मेसेज कोणी पाठवला आणि कोणाला पाठवला. यात एका रशियन मुलीची किंमत १००० डॉलर सांगितली गेली आहे.
डोनाल्ट ट्रम्प यांचे देखील फोटो आहेत?
मागच्या आठवड्यातही १९ फोटो जारी करण्यात आले होते. यामध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे देखील काही फोटो आहेत. ट्रम्प यांनी त्यावेळी सांगितले होते की एप्सटीनसोबत सर्वांचे फोटो आहेत, ही काही मोठी गोष्ट नाही. नव्या फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, प्रोफेसर आणि राजकीय कार्यकर्ते नोम चॉम्स्की आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव बॅननही दिसत आहेत. मात्र या सर्वांच्या प्रतिनिधींकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. डेमोक्रॅट खासदारांनी स्पष्ट केले आहे की या फोटोंमध्ये कोणाचे दिसणे हे कोणत्या गुन्ह्याचे पुरावे नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की फोटो फक्त पारदर्शकतेच्या उद्देशाने जारी करण्यात आले आहेत.
Donald trump
एप्स्टीन फाइलवरून उडालेला गदारोळ
हाउस ओवरसाइट कमिटीमध्ये प्रमुख डेमोक्रॅट खासदार रॉबर्ट गार्सियाने सांगितले की एप्सटीन फाइल्स ट्रान्सपेरेंसी अॅक्टची मुदत जवळ येत आहे आणि अशा वेळी हे फोटो प्रश्न उपस्थित करतात की न्याय विभागाकडे नेमके काय आहे. त्यांनी व्हाइट हाउसवर प्रकरण दाबण्याचा आरोप लावत फाइल्स ताबडतोब जारी करण्याची मागणी केली. तर व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या एबिगेल जॅक्सनने सांगितले की या फोटोंच्या जारी होण्याने काही बदलत नाही. त्यांच्या मते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आधीपासूनच एप्सटीन फाइल्समध्ये पारदर्शकतेची चर्चा करत होते आणि त्यांच्या सरकारने या दिशेने काम केले आहे.
Leave a Reply