
Jeffrey Epstein Reveal: अमेरिकेतील हाऊस ओव्हरसाईट डेमोक्रॅट्सने गुरुवारी नवीन फोटोंची मालिका सार्वजनिक केली आहे. त्यात मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांच्यासह इतरही काही लोकांसोबत महिलांचे फोटो आहेत. तर एका फोटोमध्ये एका महिलेचा पाय दिसत असून त्यावर व्लादिमीर नाबोको याची वादग्रस्त कादंबरी लोलितामधील (Lolita, Vladimir Nabokov Novel) ओळी लिहिलेल्या आहेत. तर मुलींचे रेट लिहिल्याचे संदेशही या समितीच्या हाती लागला आहे.
अत्यंत अश्लील ओळी
या फोटोमध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. बड्या लोकांसोबत मुली दिसत आहेत. त्यात अनेक दिग्गज आहेत. पण याचा अर्थ ते सगळेच जेफ्री एपस्टीनच्या लैंगिक शोषणाच्या रॅकेटमध्ये गुंतलेले होते असे म्हणता येत नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. पण यामध्ये एक फोटो आहेत. त्यात एका मुलीच्या पायावर लोलिता या कादंबरीतील काही ओळी लिहिल्या आहेत. तर वाक्प्रचार ही अगोदर लिहिलेला आहे. तो कादंबरीचा भाग आहे.
‘लो-लि-ता : जिभेच्या अग्रभागाचा प्रवास’ असे एक कॅप्शनही समोर आलं आहे. त्याखाली
“She was Lo, plain Lo, in the morning, standing four feet ten in one sock,” written on a foot
“She was Lola in slacks”
“She was Dolly at school,”
अशा ओळी काही मुलींच्या मानेवर, पायावर आणि पाठीवर लिहिलेल्या आढळल्या. समिती सदस्यांच्या मते हा कोड वर्ड आहे. या ओळीतून काही तरी संदेश समोरच्या व्यक्तीला देण्यात आला आहे. एका फोटोत लोलिता ही कांदबरी पण बेडवर असल्याचे दिसून येते.
18 वर्षाच्या मुलीचा रेट किती?
एपस्टीन फाईल्समध्ये अनेक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर येत आहेत. आपल्या वलयाचा फायदा घेत जेफ्री एपस्टीन आणि त्याच्या इतर भागीदारांनी कोवळ्या वयातील मुलींचे लैंगिक शोषण केले. त्यातील काहींचे आयुष्य उद्धवस्त झाले. तो अनेक बड्या नेत्यांना, उद्योगपतींना आणि श्रीमंतांना या मुलींचा पुरवठा करत असल्याचा त्याच्यावर ठपका आहे. एपस्टीन याला 13 महिन्यांचा कारावास झाला होता. तर 2015 मधील ताज्या आरोपानंतर त्याला 2019 मध्ये त्याला पुन्हा तुरुंगात जावे लागले होते. तिथेच त्याने फाशी घेतल्याचा दावा करण्यात येतो.
NEW: Oversight Dems are releasing additional photos from Jeffrey Epstein’s estate to the public.
We will continue releasing photographs and documents to provide transparency for the American people. It’s time for the Department of Justice to release the files. pic.twitter.com/ZGAvxVLCUq
— Oversight Dems (@OversightDems) December 18, 2025
तर एका फोटोमध्ये 18 वर्ष मुलीच्या रेट किती याची चर्चा झाल्याचे समोर येत आहे. त्यानुसार, मी इतर कुणाला तरी सध्या पाठवू शकत नसल्याचा पहिला संदेश दिसतो. तर माझ्या मैत्रिणीच्या ओळखीतील एक मुलगी आहे. पण ती 1000 डॉलरची मागणी करत असल्याचे संदेशात दिसते. तर मी एक मुलगी तुझ्याकडे पाठवतो असे संवादात स्पष्ट होते. मुलीचे नाव, तिचे वय, तिची उंची, वजन, तिची इतर मापं आणि येण्या-जाण्याची वेळ सुद्धा या संदेशात दिसून येते. यातील अनेक मुली या रशियातील असल्याचे संवादातून स्पष्ट होते.
Leave a Reply