• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

EPFO मध्ये पुन्हा मोठा बदल; पासपोर्ट कार्यालयासारखे पॉश ऑफिस, काय होणार तुमचा फायदा?

December 28, 2025 by admin Leave a Comment


पीएफ खातधारकांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील EPFO कार्यालयात ‘सिंगल विंडो सर्व्हिस’ सेवेची सुविधा सुरु होत आहे. या नवीन बदलाचा पीएफ धारकांना अनेक फायदे होतील. आतापर्यंत पीएफ सदस्यांना त्यांच्या अडचणी आणि काही कामासाठी प्रादेशिक कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. पण आता त्यांच्या या फेऱ्या वाचतील. एक खिडकी योजनेमुळे त्यांच्या अडचणी लवकर दूर होतील. त्यांना जास्त अर्जफाटे करावे लागणार नाही. त्यांची अडचण कधी दूर होईल हे सुद्धा त्यांना ट्रॅक करता येईल. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी याविषयीची माहिती दिली. त्यांच्या मते, ईपीएफओ कार्यालय हे पासपोर्ट ऑफिससारखे एकदम पॉश आणि पद्धतशीरपणे चालतील.दिल्लीत सिंगल विंडोचे काम सुरू झाले आहे. लवकरच इतर ठिकाणी हे काम सुरू होईल.

पूर्वी काय होता नियम?

पूर्वी असा नियम होता की खातेदारांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर प्रादेशिक कार्यालयात धाव घ्यावी लागते. नवीन व्यवस्थेत आता जवळपास 100 टक्के कार्यपद्धत ही डिजिटल झाली आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी प्रादेशिक कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. ईपीएफओची कामे ऑनलाईनच होतील. तर काही कामं कार्यालयात जाऊन करायची असेल तर तिथे अर्जफाटे आणि ताटकळत बसण्याची गरज नाही. एक खिडकी योजनेमुळे ही कामं किती दिवसात होतील हे लागलीच समजेल. सदस्यांना त्यासाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाही. त्यांना तक्रारीचा निपटारा कधीपर्यंत होईल हे लागलीच ऑनलाईन तपासता येईल. रक्कम काढण्याचे जे दावे आहेत, त्याचा निपटारा पण झटपट होईल. काही दिवसात ईपीएफओच्या एटीएममार्फत रक्कम काढता येईल. ऑनलाईन अनेक दाव्यांचा निपटारा होईल. इतकेच नाही तर नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना UPI मार्फत सुद्धा ईपीएफओची रक्कम काढता येईल.

काय होतील अजून फायदे

लवकरच ईकेवायसी व्हेरिफिकेशन ड्राईव्ह पूर्ण करण्यात येईल. त्यात कर्मचाऱ्याची, त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे ईकेवायसीचे काम पूर्ण करण्यात येईल. त्याची पत्नी, कुटुंबातील सदस्य, मुलं यांची माहिती आणि ईकेवायसी पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे पुढे अर्ज झाल्यावर त्या कर्मचाऱ्यांची इत्यंभूत माहिती समोर येईल. त्यामुळे कर्मचारी दगावला तरी त्याच्या कुटुंबियांना पेन्शन आणि विमा दाव्यासाठी अडचण येणार नाही. ही कामे ऑनलाईन पूर्ण करता येतील. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना याविषयीची मदत झटपट करता येईल. त्यांची क्लेम प्रोसेस लवकर होईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जेवल्यानंतर लगेच झोपताय? करू नका ही भयंकर चूक; डॉक्टरांचा मोठा इशारा!
  • मुनीर विरोधात बोलण भोवलं, माजी पाकिस्तानी आर्मी ऑफिसरवर कठोर कारवाई, थेट…
  • Shubman Gill याचा धमाका, प्रिन्स 3 वर्षात सलग दुसऱ्यांदा 1 नंबर, नक्की काय केलं?
  • Girija Oak: गिरिजा ओकच्या सौंदर्यावर इम्रान हाश्मी फिदा, विमानात तिला पाहिलं अन् सतत.. काय घडलं?
  • रोज केवळ 20 मिनिटे चालल्याने कमी होईल 10 किलो वजन, कसे ते तज्ज्ञांकडून जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in