• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

EPFO मधून एका वेळी किती पैसे काढता येतात?, पाहा संपूर्ण अपडेट

December 13, 2025 by admin Leave a Comment


EPFO म्हणजे जेथे तुमचे प्रोव्हीडन्ट फंडाचे पैसे जमा होतात. अनेक गरजेच्या वेळी किंवा इमर्जन्सीला तुम्हाला तुमच्या प्रोव्हीडन्टचे पैसे काढायचे असतात. समजा तुम्हाला एक लाखाची गरज आहे. आणि तुम्ही तुमच्या पीएफमधून पैसे काढण्यासाठी अर्ज केला. परंतू तुम्हाला प्रत्यक्षात ६० हजार मिळतात. तेव्हा तुम्ही विचार करता की तुम्ही एक लाख मागितले होते मग ६० हजार का मिळाले असा प्रश्न तुमच्या मनात येतात. चला तर पाहूयात EPFO मधून तुम्ही किती पैसे काढू शकता.

तुम्ही तुमच्या पीएफ (EPF) गरजेनुसार पैसे काढू शकता.,ज्यात काही वेळा ( आजारपण, लग्न, किंवा घर खरेदी ) १०० टक्क्यांपर्यंत रक्कम मिळते. परंतू काही वेळा ७५ टक्के रक्कम काढता येते. निवृत्तीनंतर मात्र तुम्ही संपू्र्ण रक्कम काढू शकता. अलिकडे बदललेल्या नियमात पैसे काढणे सोपे केले आहे.
१२ वर्षांची सेवा झाली असेल तर १०० टक्के रक्कम काढता येणार आहे.

घर खरेदी आणि दुरुस्तीसाठी किती ?

जर तुम्ही घर खरेदी करायला जात आहात किंवा तुमच्या घराची दुरुस्ती करु इच्छीता तर तुम्ही तुमच्या प्रोव्हीडन्ट फंडातून ९० टक्के रक्कम काढू शकता. समजा तुमच्या खात्यात १ लाख रुपये आहेत. तर तुम्ही ९० हजारापर्यंत या कामासाठी काढू शकता.

आजारपणा किती पैसे काढता येतात –

जर तुमच्या कुटुंबातील कोणी आजारी असेल तर तुम्ही इलाजासाठी १०० टक्के पूर्ण रक्कम काढू शकता. तसेच तुमची मुले किंवा भाऊ – बहिणीचे शिक्षण किंवा लग्नासाठी तुम्ही तुमचे योगदान + व्याजाचे ७५ टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकता.

नोकरी करताना किती पैसे काढू शकता ?

जेथे तुम्ही काम करत आहात. तेथे तुम्ही १२ महिन्यांचा काळ पूर्ण केला असेल तर तुम्ही जमलेल्या रकमेच्या २५ टक्के वगळून उर्वरित पैसे काढू शकता. समजा तुमच्या खात्यात १ लाख रुपये असेल तर ७५ हजार रुपये काढू शकता.

नोकरी सोडल्यानंतर किती पैसे काढता येतात ?

जर तुम्ही नोकरी सोडली आहे किंवा तुमची नोकरी गेली असेल कर तुमच्याकडे कोणतेही काम नसेल तर या स्थितीत तुम्ही तुमच्या प्रोव्हीडंड फंडाचे संपूर्ण पैसे दोन महिन्यानंतर काढू शकता. काही प्रकरणात यासाठी १२ महिन्यांचा वेळमर्यादा निश्चित केली आहे. जर तुम्ही निवृत्त झाला असाल तर अशा स्थितीत तुम्ही संपूर्ण पैसे काढू शकता. EPFO नव्या नियमांर्गत आता १२ महिन्यांचा सेवा पूर्ण केल्यानंतर देखील १०० टक्के रक्कम काढता येणे शक्य आहे ( काही अटी सह ) याआधी यासाठी ५ ते ७ वर्षांची नोकरी पूर्ण करण्याची अट होती.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चपाती वाकड्या करते, चहा फिका बनवते..पती-पत्नीच्या भांडणाची अजब कारणे, काऊन्सिलर झाले आश्चर्यचकीत !
  • Maharashtra Assembly : शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायचं, भर सभागृहात मंत्र्याचा संताप; म्हणाला उबाठा वगैरे…
  • ‘ट्रम्प कंडोम ₹407’, त्या फोटोने Trump यांच्या सिंहासनाला हादरे, जेफ्री एपस्टीचे भूत पुन्हा मानगुटीवर
  • Akshaye Khanna Dhurandhar : खरचं प्रेम असावं तर असं, ब्रेकअप नंतरही अक्षय खन्नाच्या एक्स गर्लफ्रेंडची मन जिंकणारी पोस्ट
  • India 5th Gen Fighter Jet Program : येस, करुन दाखवलं, 5 व्या जनरेशनच स्टेल्थ फायटर जेट बनवताना भारताला मोठं यश, अमेरिकेचा होईल जळफळाट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in