
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी आणि काही वादग्रस्त प्रसंग समोर आले आहेत. काही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठीचे मतदान पुढे ढकलण्यात आले असून, आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, वाशिम, देऊळगाव राजा, अंबरनाथ, फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत, घुगुस, देवळी, देवळाली-प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा, अनगर यांसारख्या अनेक ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
अमरावती विभागात १८७ नगरसेवकांच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १४४, पुण्यात १४३, नाशिकमध्ये १२०, कोकण विभागात ६९ आणि नागपूर विभागात ६८ नगरसेवकांच्या निवडणुका २० डिसेंबरला होणार आहेत. निवडणूक आयोगाने या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, कलम १७१ (ब) नुसार उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास त्याला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणे आवश्यक आहे. अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम होऊन निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या. पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्याने उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही, फक्त अर्ज मागे घेता येणार आहे.
Leave a Reply