
पुढल्या वर्षात अर्थात 2026 मध्ये अनेक मोठे, महत्वाचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर रिलीज होणार आहेत, त्यापैकीचएक म्हणजे अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ (Drishyam 3) . हा या चित्रपटाचा तिसरा भाग असून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट खूप चर्चेत आहे. 2 ऑक्टोबर 2026 हा पिक्चर रिलीज होणार असल्याची घोषणा करण्यात आली. चित्रपटाच्या घोषणेपासून, त्याच्या कलाकारांबद्दल बऱ्याचा बातम्या समोर आल्या आहेत. मात्र अक्षय खन्नाने (Askahaye Khanna) हा चित्रपट करण्यास नकार दिल्याने बरीच खळबळ माजली, मेकर्सनी त्याच्यावर अनेक आरोपही केले. अखेर आता नव्या कास्टची एंट्री झाली असून चित्रपट आता शूटिंगच्या पुढील टप्प्यात प्रवेश करणार आहे, आणि नवीन कलाकार हे नवं शेड्यूलही जॉईन करणार आहेत.
दृश्यम या त्याच्या क्लासिक चित्रपटाच्या तिसऱ्या भागासह अजय देवगण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरू होते, पण आता हे शेड्यूल लवकरच संपणार आहे, त्यानंतर संपूर्ण टीम गोव्याला रवाना होईल. चित्रपटातील अनेक महत्त्वाची दृश्यं गोव्यात चित्रित केली जाणार आहेत, ज्यासाठी चित्रपटाचा नवा चेहरा म्हणजेच जयदीप अहलावत देखील उपस्थित राहणार आहे.
कधी संपणार शूटिंग ?
रिपोर्ट्सनुसार, फेब्रुवारीच्या अखेरीस गोव्यात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होणार आहे. अजय देवगण व्यतिरिक्त, तब्बू, श्रिया सरन आणि रजत कपूर हे देखील चित्रपटाचा महत्वाचा भाग आहेत. पण पार्ट 2 प्रमाणे, अक्षय खन्ना या चित्रपटाचा भाग नसेल. अभिषेक पाठक दिग्दर्शित करत असलेल्या दृश्यम 3 बद्दल आणि अक्षय खन्नाबद्दल खूप चर्चा होत आहे. खरंतर, अक्षय खन्ना चित्रपटाच्या दुसऱ्या भागात एका महत्त्वाच्या भूमिकेत होता. त्याचप्रमाणे तो तिसऱ्या भागातही दिसणार होता. मात्र अचानक त्याने हा चित्रपट सोडल्याची माहिती समोर आली.
अक्षय खन्ना सध्या त्याच्या धुरंधर चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. सुरुवातीला त्याच्या फीच्या मागणीमुळे तो दृश्यम 3 मधून बाहेर पडत असल्याची बातमी समोर आली. पण,फीच्या मागणीव्यतिरिक्त, त्याच्या इतर अनेक मागण्या होत्या, त्या पूर्ण करण्यात आल्या होत्या असा खुलासा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला होता. पण तरीही अक्षय चित्रपटातून बाहेर पडला. आता त्याच्या जागी जयदीप अहलावत हा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Leave a Reply