
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट ५ डिसेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या २१ दिवसांनंतरही चित्रपटाची जबरदस्त कमाई सुरुच आहे. चित्रपटाला भारतासोबतच जगभरातही प्रचंड पसंती मिळवली आहे. ‘धुरंधर’ने जागतिक स्तरावर प्रचंड कमाई केली आहे. हा चित्रपट २०२५ सालची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे आणि आता या चित्रपटाच्या कमाईने सुपरस्टार शाहरुख खानच्या देखील सिनेमालाही मागे टाकले आहे.
मेकर्सनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चित्रपट १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर चाहते आनंद व्यक्त करत आहेत. या चित्रपटाने शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. तसेच कांतारा चॅप्टर १ आणि छावा यांचा रेकॉर्ड मोडला आहे. आता हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
१००० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री
मेकर्सनी ‘धुरंधर’चे पोस्टर शेअर करून सांगितले आहे की चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २१८ कोटी, दुसऱ्या आठवड्यात २६१.५ कोटी आणि १५-२० दिवसांत १६०.७० कोटींचे कलेक्शन केले आहे. त्यानंतर ख्रिसमसला फिल्मने २८.६० कोटी कमावले आहेत. फिल्मने भारतात ७८९.१८ कोटी आणि ओव्हरसीजमध्ये २१७.५० कोटींचा कलेक्शन केला आहे. त्यानंतर एकूण कलेक्शन १००६.७ कोटी झाले आहे. चाहते ही पोस्ट पाहून खूप खुश होत आहेत. आता चाहते याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.ॉ
पठाणचा तोडणार रेकॉर्ड
‘धुरंधर’ची नजर आता शाहरुख खानच्या पठाणवर आहे. पठानचे ऑलटाइम जागतिक कलेक्शन १०५०.३० कोटी आहे. ते मोडण्यासाठी ‘धुरंधर’ला जास्त वेळ लागणार नाही. वीकेंडपर्यंत चित्रपट आरामात हा रेकॉर्ड मोडून टाकेल.
१००० कोटी कमावणारा ९वा चित्रपट
‘धुरंधर’ आता बॉलिवूडच्या १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा ९वा चित्रपट ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर दंगल २०७० कोटी, दुसऱ्या क्रमांकावर पुष्पा २ – १८७१ कोटी, तिसऱ्या क्रमांकावर आरआरआर १२३० कोटी, चौथ्या क्रमांकावर केजीएफ चॅप्टर २ – १२१५ कोटी आणि पाचव्या क्रमांकावर जवान ११६० कोटींसह आहेत.
‘धुरंधर’ची बात करायची झाली तर यात रणवीर सिंहसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, आर माधवन आणि राकेश बेदी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत.
Leave a Reply