• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar : रेहमान डकैतच्या रोलसाठी अक्षय खन्ना नव्हता पहिली चॉईस ? रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याने शेअर केला ऑडिशनचा व्हिडीओ

December 12, 2025 by admin Leave a Comment


प्रख्यात दिग्दर्शक आदित्य धर याने दिग्दर्शित केलेला ‘धुरंधर’ (Dhurandhar ) सध्या बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवतोय. आठवड्याभरातच चित्रपटाने तूफान कामगिरी करत भरपूर कमाई केली आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे जगभरात कौतुक होत असून त्याची गाणी, सीनही खूप गाजत आहेत. पण यामध्येही सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती खलनायकी भूमिका साकारणारा रेहमान डकैत अर्थात अक्षय खन्ना ( Akshaye Khanna) याची.

धुरंधरमधील अक्षय याचा अभिनय, त्याचा स्वॅग, अरबी गाण्यावरचा त्याचा डान्स मूव्ह्ज, प्रत्येक गोष्टीची भरभरून चर्चा होत असून सोशल मीडियावरही त्याच्या नावाने कित्येक व्हिडीओ, मीम्स, फिरत आहेत, व्हायरलही होत आहेत. त्याचे लाखो चाहते होतेच, पण धुरंधर नंतर अक्षयच्या फॅन फॉलोइंगमध्येही चांगलीच वाढ झाली आहे.

सध्या अक्षय धुरंधरमधल्या हिट एंट्री साँगमुळेही चर्चेत आला आहे. पण या चित्रपटासाठी रेहमान डकैतची भूमिका अक्षय खन्ना नव्हे तर दुसऱ्या अभिनेत्याला ऑफर झाली होती, हे तुम्हाला माहीत आहे का ? आता खुद्द त्याच अभिनेत्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे, एवढंच नव्हे तर या भूमिकेसाठी दिलेल्या ऑडिशनचा व्हिडीओ देखील त्याने शेअर केला आहे.

Akshaye Khanna : ज्यांच्यासाठी बॉलिवूड सोडून विनोद खन्नांनी संन्यास घेतला, त्या ओशोंना अक्षय खन्ना मानतो का ?

ऑरीला ऑफर झाला होता रेहमान डकैतचा रोल !

ओरहान अवत्रामणी अर्थात ऑरी या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, क्रिएटर.. ऑरी हा सोशल मीडियावर तर प्रचंड ॲक्टिव्ह असतोच, पण वेगवेगळे सेलिब्रिटी, स्टार यांच्याही तो खूप नजीक असतो. अंबानींपासून ते शाहरुखपर्यंत अनेकांसोबत ऑरी त्याचे फोटो अपलोड करत असतो. तर याच ‘ऑरी’ने आता सोशल मीडियावर एका नवा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ऑरी हा बर्फाने आच्छादेल्या पर्वत रांगामध्ये अगीद अक्षय खन्नाच्या स्टाईलमध्ये एंट्री घेताना दिसतोय. गाडीतून स्वॅगमधअए उतरलेला ऑरी धुरंधरमधल्या त्याच हिट गाण्यावर डान्स करतानाही दिसला आहे. यासोबतच ऑरीने खास मेसेजही लिहीला, माझी ऑडिशन vs ज्या व्यक्तीला हा (रेहमान डकैतचा) रोल मिळाला तो…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry)

खरं सांगायचं तर ऑरीने हा व्हिडीओ अगदी मस्तीच्या मूडमध्ये टाकला आहे. या व्हिडीओसह ऑरीने मजेशीर कॅप्शनही टाकली होती – कदाचित माझी फी थोडी जास्त होती.. पण धुरंधरमधील त्याच्या कास्टिंगशी त्याचं काहीच घेणंदेणं नव्हतं, त्याने फक्त मजा केली. पण ते पाहून नेटकऱ्यांनीही त्याची मजा घेतली.

व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

ऑरीच्या व्हिडिओवर बऱ्याच मजेदार कमेंट्स आल्या आहेत. एकाने लिहिले, ” पुकी अक्षय खन्ना.” तर दुसऱ्याने कमेंट केली, “हो, कदाचित तू त्यांना (धुरंधर मेकर्स) परवडणार नाहीस”. ” कास्टिंग डायरेक्टरला खरंच पश्चाताप होत असेल”, अशीही कमेंट एकाने केली. तर आणखी एका युजरने अजूनच भन्नाट कमेंट केली, ” त्यांचं बजेट कमी होतं, नाहीतर अक्षय खन्नाच्या जागी नक्कीच तू दिसला असतास”, असं त्याने लिहीलं. एकंदरच नेटकऱ्यांनीह ऑरीलीच खूप टर उडवल्याचे दिसून आलं.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हे आहे जगातील सर्वात जास्त महागडं फळ, किंमत ऐकून घाम फुटेल, एका लक्झरी कारपेक्षाही जास्त किंमत
  • Chanakya Niti : आनंदी आयुष्यासाठी पती-पत्नीने रोज ही गोष्ट केलीच पाहिजे, चाणक्य काय म्हणतात?
  • Squash World Cup: 29 वर्षात भारताने पहिल्यांदाच मिळवलं जेतेपद, या खेळाडूंमुळे झालं शक्य
  • CIA चे हिमालयातील ते गुप्त मिशन, 60 वर्षानंतरही भारतासाठी का आहे धोकादायक ?
  • अपघातानंतर महिमा चौधरीचा चेहरा विद्रूप झाला होता; अनेक चित्रपट गमवावे लागले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in