• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar : मी 300 कोटीच्या प्रोपेगेंडा फिल्मला उद्धवस्त करणार, धुरंधर चित्रपटाला चॅलेंज करणाऱ्या त्या व्हिडिओमध्ये काय होतं?

December 22, 2025 by admin Leave a Comment


‘माझा एक व्हिडिओ 300 कोटीच्या प्रोपेगेंडा चित्रपटाला उद्धवस्त करेल’ असं म्हणणाऱ्या ध्रुव राठीने अखेर त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ध्रुव राठी एक राजकीय विश्लेषक आणि कंटेट क्रिएटर आहे. ध्रुव राठीने त्याच्या व्हिडिओमधून आदित्य धरच्या धुरंधर चित्रपटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. धुरंधर हा खोटा आणि प्रोपेगेंडा म्हणजे प्रचारकी चित्रपट असल्याचं त्याने म्हटलं आहे. याआधी त्याने चित्रपटातील हिंसाचारावर टीका केली होती. “धुरंधर चित्रपट हा राजकारणाकडे झुकणारा आहे. जे चित्रपट खराब बनवले जातात, त्यापेक्षा हा धोकादायक आहे” असं त्याने म्हटलं आहे. त्याने त्याचा नवीन व्हिडिओ युट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे.

‘रिएलिटी ऑफ धुंरधर’ असं त्याने त्याच्या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. खोटा आणि वाह्यात चित्रपट अशी त्याने टीका केली आहे. दिग्दर्शक आदित्य धरने चित्रपटातून खोटं विकण्याचा प्रयत्न केलाय असा त्याने आरोप केला. चित्रपट चांगला बनवल्याचं त्याने मान्य केलं. पण त्याच्या दृष्टीकोनातून हा चित्रपट जास्त धोकादायक आहे. ‘चांगला बनवलेला प्रोपेगेंडा जास्त धोकादायक’ असं त्याने म्हटलं. ‘द ताज स्टोरी आणि ‘बंगाल फाईल्स’ सारखे चित्रपट धोकादायक नव्हते. कारण ते बकवास चित्रपट होते, असं ध्रुव राठीचं म्हणणं आहे. त्याच्या दृष्टीने धुरंधर हा गुंतवून ठेवणारा चित्रपट आहे.

पहिल्या पोस्टमध्ये ध्रुव राठीने काय म्हटलेलं?

धुरंधर चित्रपटाचं विश्लेषण करणारा व्हिडिओ पोस्ट करण्याआधी या ध्रुव राठीने “लवकरच मी चित्रपटावर एक व्हिडिओ रिलीज करणार आहे. 1 युट्यूब व्हिडिओ 300 कोटीच्या प्रोपेगेंडा चित्रपटाला उद्धवस्त करेल” असं त्याने म्हटलं होतं. ‘या व्हिडिओनंतर त्यांची वाईट अवस्था होईल. ते यासाठी तयार नाहीयत. आज रात्री रिलीज होणार आहे’ असही ध्रुव राठीने पोस्टमध्ये म्हणाला होता.

आतापर्यंत किती कोटींची कमाई

अजूनही बॉक्स ऑफिसवर असलेली या चित्रपटाची जादू कमी झालेली नाही. या वर्षातील भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. 5 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज झाला. भारतात नेट 480 कोटीपेक्षा जास्त आणि जगभरात या चित्रपटाने 740 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पैशांचा पाऊस, गोळीबार… अन् माजी मंत्र्याच्या मुलाला अटक, धुळे पोलिसांनी आंदोलनातूनच उचललं
  • GK : कोणत्या देशातील लोक सर्वात कमी दिवस जगतात? मृत्यूचे कारण काय?
  • Top Trending Film On OTT: नेटफ्लिक्सचा सर्वात डेंजर चित्रपट, पहिल्या मिनिटापासून डोकं होईल सुन्न, एकदा पहिल्यावर चकितच व्हाल!
  • Explainer : देशाच्या नव्या भूकंप नकाशाने खळबळ, 75 टक्के लोकसंख्या डेंजर झोनमध्ये?, पाहा काय आहे इशारा
  • शॅम्पूमध्ये या 4 गोष्टी मिसळा, केसांची वाढ होईल झटपट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in