
सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. लोकांना हा चित्रपट खूप भावला आहे. अलीकडेच हृतिक रोशनने हा चित्रपट पाहिल्यानंतर एक पोस्ट शेअर केलेली. दिग्दर्शक आदित्य धरच त्याने कौतुक केलेलं त्याचवेळी चित्रपटाबद्दल एक असं मत मांडलेलं जे लोकांना अजिबात पटलं नव्हतं. त्यावरुन ट्रोलिंग झाल्यानंतर हृतिक रोशनला पुन्हा पोस्ट करावा लागलेली.
आता धुरंधर चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरने हृतिक रोशनच्या या पोस्टला उत्तर दिलयं. त्याने उत्तर देताना आपल्यातली विनम्रता दाखवून जिंकून घेतलय. त्याआधी हृतिक रोशनने काय म्हटलेलं ते जाणून घेऊया.
धुरंधरची स्टोरीटेलिंग मला आवडली. पण त्यात दाखवलेल्या पॉलिटिक्सशी मी सहमत नाही. फिल्ममेकर्सची काय जबाबदारी उचलली पाहिजे यावर मी वादविवाद करु शकतो” त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. म्हणून हृतिक रोशनने दुसरी पोस्ट केली.
आता आदित्य धरने काय म्हटलय ते जाणून घेऊया. “धुरंधर चित्रपटाबद्दलचं तुमचं प्रेम पाहून मी खूप खुश आहे. सर, प्रत्येक कलाकार आणि चित्रपटाच्या प्रत्येक विभागाने 100 टक्के काम केलय. तुमच्या कौतुकाने संपूर्ण फिल्म टीमचा उत्साह वाढवला आहे. त्यांच्या कलेच कौतुक केल्याबद्दल तुमचे भरपूर आभार. पार्ट 2 येतोय. तु्म्ही जे प्रोत्साहन दिलय, त्याला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करु”
हृतिक रोशनला पहिल्या पोस्टसाठी ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्याने दुसऱ्या पोस्टमध्ये काय म्हटलेलं ते पाहा. “माझ्या डोक्यातून धुरंधर चित्रपट जात नाहीय. आदित्य धर एक मोठा क्रिएटर आहे. रणवीर सिंहचा परफॉर्मेंस कंसिस्टेंट आहे. अक्षय खन्ना मला नेहमीच आवडतो. सर्वांच कौतुकं. सर्वांसाठी जोरदार टाळ्या खासकरुन मेकअप आणि प्रोस्थेटिक्स टीम्ससाठी. मी पार्ट 2 ची आतुरतेने वाट पाहतोय




Leave a Reply