• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar : धुरंधरच्या यशाने हैराण झालेले पाकिस्तानी निर्माते उत्तर देणार, घेतला मोठा निर्णय

December 17, 2025 by admin Leave a Comment


रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या धुरंधर चित्रपटाच्या यशाची चर्चा पाकिस्तानपर्यंत आहे. भलेही हा चित्रपट पाकिस्तानने बॅन केला असेल, पण या चित्रपटाची स्टोरी पचवणं तिथल्या लोकांना कठीण जातय. धुरंधरवर बंदी घातल्यानंतर पाकिस्तानने आता या चित्रपटाला प्रत्युत्तर म्हणून ल्यारीवर आधारीत आपला चित्रपट बनवायची तयारी सुरु केलीय. पाकिस्तानच्या सिंध सूचना विभागाने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X ने हि माहिती दिलीय. याच चित्रपटातून ल्यारीची खरी स्टोरी दाखवू असं म्हटलय.

धुरंधरमध्ये ल्यारीची स्टोरी दाखवली आहे. पाकिस्तानात बनणार्‍या चित्रपटाचं नाव ‘मेरी ल्यारी’ असेल. ‘मेरी ल्यारी’मधून गुन्हेगारी, हिंसाचार नाही तर संस्कृती, शांतता, संघर्ष आणि सामुदायिक जीवन दाखवण्यात येईल. “चुकीच चित्र दाखवल्याने सत्य संपत नाही. ल्यारी संस्कृती, शांतता आणि मजबूतीच प्रतीक आहे. इथे हिंसाचार नाही” असं पोस्टमध्ये लिहिलय. धुरंधर हा भारतीय प्रोपेगेंडा चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानचा ‘मेरी ल्यारी’ चित्रपट जानेवारी 2026 मध्ये रिलीज होऊ शकतो.

याच प्रोपेगेंडाला उत्तर देणार

5 डिसेंबरला रिलीज झालेला धुरंधर चित्रपट ल्यारीच्या गँगवॉरवर आधारित आहे. हा चित्रपट रिलीज होताच पाकिस्तानात त्यावर टीका सुरु झालीय. पाकिस्तानात प्रेक्षक या फिल्मला प्रोपेगेंडा म्हणत आहे. काही लोकांनी पाकिस्तानच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीवर टीका केली. आपण आपला इतिहास आणि संस्कृती योग्य पद्धतीने लोकांपर्यंत का पोहोचवत नाही?. याच प्रोपेगेंडाला उत्तर म्हणून ‘मेरी ल्यारी’ चित्रपट बनवला जातोय.

भारतात आतापर्यंत या चित्रपटाची नेट कमाई किती?

भारतात आणि परदेशात धुरंधर बॉक्स ऑफिसवर सतत नवनवीन रेकॉर्ड बनवतोय. रणवीर सिंहच्या करिअरमधील हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. भारतात या चित्रपटाने नेट 351.75 कोटी रुपयाची कमाई केली आहे. रणवीर सिंहचा मागचा हिट चित्रपट ‘पद्मावत’ चा 302.15 कोटी हा कमाईचा आकडा मागे सोडला आहे.

उत्तर अमेरिकेतही धुरंधरने इतिहास रचलाय

चित्रपटाने पहिल्या आठवड्यात शानदार सुरुवात केली. दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट वेग कायम ठेऊन आहे. दुसऱ्या शुक्रवारी धुरंधरने 32 कोटींची कमाई केली. 2025 मधील हा रेकॉर्ड आहे. उत्तर अमेरिकेतही धुरंधरने इतिहास रचलाय. बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. चित्रपटात रणवीर सोबत अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर माधवन आणि संजय दत्त सारखे अनेक मोठे कलाकार आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चिकन आणि मटणापेक्षा ‘या’ डाळीमध्ये लपलाय Protein चा भंडार… जाणून घ्या Easy आणि Tasty रेसिपी
  • Aashish Shelar : …तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना… आशिष शेलार यांचा दोन्ही ठाकरेंना टोला
  • केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या
  • आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते..; ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा कडक ट्रेलर
  • राष्ट्रपती भवनातील परमवीर गॅलरीचे उद्घाटन, भारतीय शूर वीरांच्या छायाचित्रांनी घेतली ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या फोटोंची जागा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in