• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar : तब्बल 1300 मुलींपैकी रणवीरसोबत रोमान्ससाठी 20 वर्षांनी लहान अभिनेत्रीलाच का निवडलं? डोकं चक्रावणारं कारण समोर

December 15, 2025 by admin Leave a Comment


Dhurandhar: आदित्य धरने दिग्दर्शित केलेला ‘धुरंधर’ (Dhurandhar)चित्रपट लोकांना खूप आवडतोय. माऊथ पब्लिसिटीमुळे पिक्चर खूप चालतोय, बॉक्स ऑफीसवरही त्याची घोडदौड सुरू आहे. दुसऱ्या वीकेंडलाच चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली आहे. चित्रपटातील सर्वांचंच काम प्रेक्षकांना खूप आवडलं असून लोकांनी ‘धुरंधर’ डोक्यावर उचलून धरला आहे. मात्र फिल्मचा टीझर रिलीज झाल्यापासूनच अनेक लोकांना एक गोष्ट खटकत आहे, ती म्हणजे – रणवीर सिंगचा (Ranveer Sing) 20 वर्षांनी लहान अभिनेत्रीशी रोमान्स. अनेकांनी या कास्टिंग चॉईसवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या चित्रपटात रणवीर सिंगच्या समोर सारा अर्जुन (Sara Arjun) ही अभिनेत्री असून त्यांच्या रोमान्स दाखवण्यात आला आहे. 6 जुलै 1985 साली जन्मलेला रणवीर हा सध्या 40 वर्षांचा आहे तर 18 जून 2024 साली जन्मलेली सारा अर्जुन आत्ता अवघ्या 20 वर्षांची आहे. दोघांच्या वयातलं हे अंतर अनेकांना खटकलं आहे. पण आता कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा याने यामागचं आणि साराला का निवडलं याचं कारण सांगितलं आहे.

‘धुरंधर’च्या कास्टिंगवर काय म्हणाले मुकेश छाब्रा?

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’चा पहिला टीझर प्रदर्शित झाल्यापासून, लोकांना एका गोष्ट खटकत आहे : 20 वर्षीय सारा अर्जुनला रणवीरसोबत पाहून अनेकांना वेगळं वाटलं. रणवीर त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीशी रोमान्स कसा करू शकतो हा एकच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही हा मुद्दा कायम आहे. सारा आणि रणवीरच्या प्रेमसंबंधावर अजूनही अनेकजण प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.

पण साराला रणवीरच्या अपोझिट का कास्ट केले, हे कास्टिगं डायरेक्टरनेच थेट सांगितलं. ‘मला अगदी क्लिअर ब्रीफ मिळालं होतं. (चित्रपटात) तो (हमजा) मुलीला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आम्हाला माहीत होतं की आम्हाला 20-21 वर्षांची तरूण मुलगी हवी होती’ असं मुकेश छाब्रा यांनी सांगितलं.

मुकेश छाब्रा म्हणाले की, वयाच्या फरकाबद्दल बोलणाऱ्या लोकांना पार्ट-2 आल्यावर सगळं समजेल. 26-27 वयोगटात चांगल्या अभिनेत्री नाहीत असे नाही, परंतु चित्रपटात हा वयाचा फरक दाखवणे महत्त्वाचे होते. तुम्ही लोकांना सगळंच समजावून सांगू शकत नाही, पण वयाच्या फरकाबद्दल वाचून मला हसू आलं. ते चित्रपटाच्या ब्रीसार, अगदी बरोबर होतं, असं त्यांनी नमूद केलं.

सारा अर्जुनची का झाली निवड ?

1300 मुलींमधून सारा अर्जुनच्या ऑडिशनमध्ये असं काय खास दिसलं, ज्यामुळे तिची चित्रपटासाठी निवड केली याचं उत्तरही मुकेश यांनी दिलं. ते म्हणाले, ” “आदित्यसारखे अनेक दिग्दर्शक आता नवीन चेहऱ्यांना संधी देत ​​आहेत, याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळे माझी कल्पना अशी होती की आपण एक संपूर्ण नवीन जग निर्माण करत आहोत. आम्ही सरप्राईज कास्टिंग करत होतो आणि ती मुलगी एकदम फ्रेश वाटली पाहिजे. तिने (सार) लहानपणी जरी काम केलं असलं तरी आम्हाला तिला नव्या अंदाजात सादर करायची इच्छा होती. मी सारासोबत अनेक वर्षांपासून काम केलं आहे, ती ऑडिशन द्यायला येत असते. ती खूप गोड मुलगी आहे. तिने जेव्हा (धुरंधरसाठी) ऑडिशन दिली, तेव्हा तिच्या गोड चेहऱ्यामागचं टॅलेंट मला दिसलं. ती कमाल अभिनेत्री आहे, पार्ट-2 मध्ये तुम्हाला दिसेलच” असंही मुकेश छाब्रा यांनी नमूद केलं. “धुरंधर” हा दोन भागांचा चित्रपट आहे, दुसरा भाग 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत, पहिल्या भागाने भारतात कोट्यवधींची कमाई करत बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Explainer: भारताचा तांदळाचा इतिहास काय ? ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार ?
  • दात नेमके कसे साफ करावेत? योग्य पद्धत कोणती?
  • Business Idea: हाच चौसष्ट घरांचा राजा! रस्त्यावरचा दगड विकून कमावले 5 हजार; इंटरनेटवर Viral Video पाहिला का?
  • मासे खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, गाठावे लागेल थेट हॉस्पिटल
  • कोर्टात खेचलं..; पदार्पणानंतर हिरोइनच्या आयुष्यात वादळ, भीषण अपघातानंतर बिघडला चेहरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in