
बॉलिवूडचे ही-मॅन, प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी 9.30च्या सुमारास निधन झालं आहे. वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना दोन आठवड्यापूर्वी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. प्रकृतीत फरक पडल्याने त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. पण आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनाची त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाहीये. पण त्यांचं संपूर्ण कुटुंब विलेपार्ले येथील स्मशानभूमीत पोहोचलं आहे. तसेच बॉलिवडूचे अनेक कलाकारही स्मशानभूमीत दाखल झाले आहेत. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आमिर खान हे सुद्धा धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत आले आहेत.
Leave a Reply